Friday, July 5, 2024

ही आहे हॉलिवूडमधील सर्वाधिक श्रीमंत कलाकारमंडळी, संपत्तीचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल दंग

आपण सगळेच हॉलिवूड चित्रपटांचे शौकीन आहोत. त्यांच्या उत्कृष्ट सिनेमटोग्राफी आणि उत्कृष्ट व्हीएफएक्स प्रभावांमुळे आपणा सर्वांना त्यांचे चित्रपट आवडतात. हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्याला अनेक महान अभिनेते पाहायला मिळतात. ज्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर करोडो लोकांची मने जिंकली आहेत. आजकाल अनेक मोठे कलाकार स्वतः निर्माते बनले आहेत. ते चित्रपटांमधून मोठी कमाई करत असतात. याच संदर्भात आज आपण या लेखात पाहणार आहोत, असे ५ अभिनेते जे हॉलिवूडमध्ये सर्वाधिक श्रीमंत आहेत.

मेल गिब्सन
मेल गिब्सन हॉलिवूडमधील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत अभिनेता आहेत. या कलाकाराची एकूण संपत्ती ४२५ दशलक्ष डॉलर्स आहे. ते एक चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता आहेत. मेल गिब्सन सध्या न्यूयॉर्कमध्ये राहत आहे. त्यांच्याकडे ‘द पॅशन ऑफ द क्राइस्ट’, ‘वी आर सोल्जर’, ‘ब्रेव्हहार्ट’ इत्यादी अनेक उत्तम चित्रपट आहेत. त्यांनी १९९५ मध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील जिंकला आहे.

रॉबर्ट डी नीरो
रॉबर्ट डी नीरो हे हॉलिवूडमधील चौथे श्रीमंत अभिनेता आहे. देशात रॉबर्ट यांना जगभरात खूप पसंती आहे. त्यांनी अनेक जुन्या आणि नव्या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने करोडो प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे ५०० दशलक्ष डॉलर्स आहे.

जॉर्ज क्लूनी
जॉर्ज क्लूनी हे हॉलिवूडमधील तिसरे श्रीमंत अभिनेता आहेत. ते अभिनेता असण्याबरोबरच एक दिग्दर्शक देखील आहेत. त्यांनी चित्रपट जगतात अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्यांना ओशन्स इलेव्हन, थ्री किंग्स सारख्या अनेक चित्रपटांनी भरपूर यश मिळाले आहे. जॉर्ज क्लूनीची एकूण संपत्ती ५०० दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.

टॉम क्रूझ
टॉम क्रूझ हा हॉलिवूडमधील दुसरा श्रीमंत अभिनेता आहे. त्याचबरोबर तो एक उत्तम अभिनेता होण्याव्यतिरिक्त निर्माता देखील आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’, ‘एज ऑफ टुमॉरो’ अशा अनेक चित्रपटांनी त्याला भरपूर यश दिले आहे. टॉम क्रूझची एकूण संपत्ती ५७० दशलक्ष डॉलर्स आहे.

जेमी गर्ट्झ

जेमी गर्ट्झ हॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. प्रसिद्ध अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक बुद्धिमान गुंतवणूकदार देखील आहे. तिने ‘ट्विस्टर’, ‘क्रॉसरोड्स’, ‘लेस द झीरो’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिची एकूण संपत्ती सुमारे ३ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिगरी यारी! अंकुश चौधरी अन् संतोष जुवेकर निघाले भटकंतीला, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

-‘हा’ दिग्गज अभिनेता नसता, तर बॉलिवूडला मिळाला नसता ‘कॉमेडीचा बादशाह’ जॉनी लिव्हर; वाचा त्यांचा रंजक प्रवास

-‘शेरशाह’च्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी बत्रा कुटुंबाला अश्रू अनावर; म्हणाले, ‘चित्रपटात सर्वकाही पाहायला मिळालं’

हे देखील वाचा