Friday, March 14, 2025
Home हॉलीवूड लग्नाआधीच पॉप सिंगर रिहाना होणार आई! बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करतेय प्रेग्नेंसी

लग्नाआधीच पॉप सिंगर रिहाना होणार आई! बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करतेय प्रेग्नेंसी

प्रसिद्ध अमेरिकन पॉप स्टार रिहाना लवकर आपल्या सगळ्यांना गोड बातमी देणार आहे. या दिवसात ती तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करताना दिसत आहे. पॉप स्टार रिहाना तिच्या बॉयफ्रेंडसोबत लवकरच नवीन पाहुण्याचे स्वागत करणार आहे. अशातच तिच्या बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ती बेबी बंप फ्लॉंन्ट करताना पोझ देताना दिसत आहे. तिने फ्रंट ओपन काळ्या रंगाच्या टॉपमध्ये पोझ दिल्या आहे. जिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

रिहाना आणि एएसएपी रॉकी त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी खूप उत्सुक आहेत. आता सध्या तिच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावरील आनंद साफ दिसत आहे. लाईट डेनिम जीन्समध्ये तिचे बेबी बंप दिसत आहे. (hollywood rihana flaunts baby bump in front open black top photos)

या फोटोमध्ये डोक्यावर काहीतरी घेतले आहे. तसेच डार्क ब्राऊन कलरची लिपस्टिक लावली आहे. रिहाना आणि तिच्या बॉयफ्रेंडने २०२१ मध्ये त्यांच्या नात्याची कबुली दिली.

रिहानाने तिच्या परिवारबाबत तिची इच्छा व्यक्त केली आहे. तिला मागील अनेक दिवसापासून आई व्हायचे होते. आता ती तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याने ती खूपच उत्सुक आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर वेगळच तेज आलेले दिसत आहे.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा