×

‘अं’मली पदार्थ खायला घालून माझ्यावर बला’त्कार केला’ जगप्रसिद्ध गायकावर गंभीर आरोप

सध्या सर्वत्र महिला अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. देशभरातील अनेक भागातून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसून येत आहे, याच पार्श्वभूमीवर आता हॉलिवूडमधूनही महिला अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध हॉलिवूड गायकावर महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून या बातमीने मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, प्रसिध्द हॉलिवूड गायक क्रिस ब्राउनवर (chris brawn) कॅलिफोर्नियामध्ये एका महिलेने आंमली पदार्थ खायला घालून बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. जेन डो असे या पिडित महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गायक क्रिस ब्राउनने ३० डिसेंबर रोजी मियामीमध्ये गेल्यानंतर या पिडित महिलेची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान तिला अंमली पेय प्यायला देण्यात आले ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. यानंतर गायकाने तिच्या असाहतेचा फायदा घेत तिला एका बंद खोलीत नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.

Chris Brown accused of drugging and raping woman on yacht - BBC News

या घटनेमुळे न्यायालयात धाव घेतलेल्या पिडीत महिलेने नुकसान भरपाई म्हणून २० दशलक्ष रुपयांची मागणी केली आहे. तत्पर्वी पिडीत महिलेच्या वकिलांनी जॉर्ज व्राबेक यांनी यावर स्पष्टीकरण देताना घटनेनंतर घाबरुन गेल्याने महिलेने पोलिस तक्रार दाखल केली नव्हती अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान क्रिस ब्राउन हा अमेरिकन गायक, संगितकार, डान्सर आणि अभिनेता म्हणून प्रसिध्द आहे. ३२ वर्षीय क्रिसचा जन्म ५ मे १९८९ रोजी अमेरिकेत झाला होता. आता या बलात्काराच्या आरोपामुळे क्रिसच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Latest Post