Monday, July 21, 2025
Home हॉलीवूड कोरोनाला पराभूत करत एड शीरन २ आठवड्यांच्या आयसोलेशनमधून बाहेर, गायकाच्या चिमुकल्या मुलीलाही झाला होता कोरोना

कोरोनाला पराभूत करत एड शीरन २ आठवड्यांच्या आयसोलेशनमधून बाहेर, गायकाच्या चिमुकल्या मुलीलाही झाला होता कोरोना

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे सर्वांनाच संकटात टाकले. अनेक कलाकार कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकून हे जग सोडून गेले. मात्र, काही कलाकारांनी या व्हायरसवर विजय मिळवला. यामध्ये हॉलिवूड गायक एड शीरनचाही समावेश आहे. एड शीरनने २ आठवड्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्याने क्वारंटाईनमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला झालेल्या त्रासाबाबत सांगितले आहे.

क्वारंटाईनमधून बाहेर आल्यानंतर ग्रॅमी अवॉर्ड विजेता एड शीरन म्हणाला की, हे दोन आठवडे खूप कठीण होते. त्याच्यासोबत त्याची मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्याची मुलगी अवघ्या १५ महिन्यांची आहे. त्याच्यासाठी आपली मुलगी लायराला असे पाहणे खूपच कठीण होते. (Hollywood Singer Ed Sheeran Came Out of Isolation Told His Daughter Was Also Covid Positive)

पत्नी दूर झाल्यानंतर मुलीसोबत होता शीरन
त्याने एका शोदरम्यान चर्चा करताना सांगितले की, “माझी पत्नी दूर होती. त्यामुळे मी माझ्या मुलीसोबत तिथे होतो. तिच्या जवळही होतो. त्यामुळे हे कठीण होते.” पुढे त्याने सांगितले की, “तीन दिवस खरंच खूप वाईट होते. जगापुढे येऊन हे सांगणे खूप विचित्र आहे. मी अजूनही उपचाराच्या प्रक्रियेतच आहे.”

पुढे बोलताना शीरन म्हणाला, “मला खरोखर सर्वांसाठी याची घोषणा करायची नव्हती. मात्र, मला इंग्लंडमध्ये ३ मोठ्या गोष्टी रद्द कराव्या लागल्या. मला कठोर व्हायचे नव्हते.”

म्युझिकल शो रद्द होण्याचा खेद
खरं तर, एड शीरन स्टुडिओ ८एचमध्ये पुनरागमन करत आहे. त्याने २४ ऑक्टोबरला सांगितले होते की, तो आयसोलेट आहे, त्यामुळे तो सर्व गोष्टींपासून दूर राहत आहे. त्याने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर २ नोव्हेंबरला सांगितले होते की, तो आता आयसोलेशनमधून बाहेर आला आहे. ६ नोव्हेंबरला एड शीरन पहिल्यांदा एखाद्या शोवर दिसला. हा काळ त्याच्यासाठी खूपच होता. याचा उल्लेख त्याने आपल्या संभाषणादरम्यान केला आहे. शनिवारी (०६ नोव्हेंबर) शीरनने म्युझिकल शोदरम्यान हजेरी लावली होती, जी त्याची कोरोनाशी लढून बाहेर आल्यानंतर तिसरी उपस्थिती होती.

एड शीरन हा इंग्रजीतील दिग्गज गायकांमध्ये गणला जातो. त्याचे म्युझिक अल्बम हे संपूर्ण जगभर चर्चेत असतात. सर्वाधिक गाणी ऐकल्या जाणाऱ्या गायकांपैकी तो एक आहे. त्याचे ‘शेप ऑफ यू’ हे गाणे युट्यूबवर सर्वाधिक मिलियन व्ह्यूज मिळवणाऱ्या गाण्यांच्या यादीत आहे.

आगामी काळात त्याचे अनेक म्युझिकल शो होणार होते. मात्र, याबाबत खेद व्यक्त करत होता की, कोरोना व्हायरसमुळे हे सर्व शो रद्द करावे लागले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कॅटरिना कैफला विकी कौशलच्या आईकडून मिळालं स्पेशल गिफ्ट! लग्नाच्या बातम्यांनी धरला जोर

-तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी

-विकी कौशल आणि कॅटरिना राजस्थानमध्ये राजेशाही थाटात करू शकता लग्न, डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन रद्द

हे देखील वाचा