Friday, February 27, 2026
Home हॉलीवूड गायक टॉम जोन्स वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी झाले होते वडील; ८० च्या वयातही त्यांचा आवाज आहे तरुण

गायक टॉम जोन्स वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी झाले होते वडील; ८० च्या वयातही त्यांचा आवाज आहे तरुण

वेल्श गायक सर थॉमस जॉन वुडवर्ड व्यावसायिकरीत्या ‘टॉम जोन्स’ म्हणून ओळखले जातात. १९६० मध्ये टॉप १० हिट स्ट्रिंगसह आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारे टॉम अजूनही खूप सक्रिय आहेत. टॉम यांनी मान्य केले की, ते वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी वडील झाल्यामुळे, वयाच्या अगोदर प्रौढ झाले होते.

फीमेलफर्स्ट डॉट कॉमशी बोलताना गायक टॉम जोन्स म्हणाले की, “अगदी लहान वयातच वडील झाल्यामुळे, मी खूप ऊर्जाशील झालो. कारण जेव्हा तुम्ही लग्न करता आणि वडील होता, तेव्हा तुम्ही लवकर परिपक्व होता. जेव्हा मार्कचा जन्म झाला, तेव्हा मी फक्त १७ वर्षांचा होतो आणि माझी पत्नी १६ वर्षांची होती. अचानक अनेक जबाबदाऱ्या आमच्यावर येऊन पडल्या. ही एक विचित्र भावना होती.”

टॉम जोन्सच्या पत्नी मेलिंडा यांचे २०१६ मध्ये निधन झाले. आपल्या पत्नीबद्दल बोलताना जोन्स म्हणतात, “जेव्हा मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा तिने मला खूप आधार दिला. ती प्रत्येक बाबतीत मला साथ द्यायची. तिला माहित होते की, मी काय करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती माझ्या सर्व कामात शंभर टक्के समर्थन द्यायची.”

टॉम यांनी पुढे सांगितले की त्यांची पत्नी एकदा म्हणाली, “तुम्हाला जे काही साध्य करायचे आहे, त्यात मी तुम्हाला मदत करीन. तुम्ही तिथे पोहचा, जिथे तुम्हाला जायचे आहे किंवा आपल्याला जायचे आहे. एकत्रितपणे आपण हा टप्पा गाठू.”

आता, वयाच्या ८० व्या वर्षीही टॉम जोन्स पूर्णतः ऊर्जेने भरलेले गायक आहेत. ‘वन मोर कप ऑफ कॉफी’ नावाच्या एका शोमध्ये त्यांनी म्हटले होते की, “वय वाढत गेल्यानंतर तुम्ही वेगळे ऐकण्यास सुरुवात करता, जे तुम्ही तरुण वयात ऐकत असलेल्यापेक्षा अगदी वेगळे असते.” आजकाल टॉम विविध प्रकारच्या गीतांवर काम करत आहेत. आजही त्याच्या आवाजात तारुण्याची धमक कायम आहे. यावर जोन्स म्हणतात की, “वयाच्या ८० व्या वर्षीही माझा आवाज ३० वर्षांचाच आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘वयाच्या १२ व्या वर्षापासून करतेय बॉडी शेमिंगचा सामना’, म्हणत अभिनेत्री इलियाना डिक्रूजने केले भाष्य

-‘तुम्ही भारताला कोरोना लसीचा पुरवठा करू शकता का?’ भारताची वाईट परिस्थिती पाहून प्रियांका चोप्राचे अमेरिकेच्या राष्ट्रपतींना ट्वीट

-आनंदाची बातमी! कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले अडकले लग्नबंधनात, साध्या पद्धतीने पार पडला लग्नसोहळा

हे देखील वाचा