वॉल्ट डिझनी यांनी आपल्या अद्भुत कल्पकतेने जगातील लोकांना खासकरून लहान मुलांना एक वेगळाच आनंद दिला आहे. विसाव्या शतकातील वॉल्ट डिझनी सर्वात प्रयोगशील, नाविन्यपूर्ण आणि प्रतिभावान लोकांमध्ये गणले जायचे. ते एकाचवेळी चलचित्रपट निर्माते, आवाज कलाकार आणि व्यावसायिक चित्रपट निर्माते होते. कार्टूनच्या दुनियेत त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. २२ ऑस्करसह चित्रपट निर्माते म्हणून सर्वाधिक अकादमी पुरस्कार जिंकण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
दिनांक ५ डिसेंबर, १९०१ रोजी शिकागो येथे जन्मलेल्या वॉल्ट डिझनी यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. लहान असताना ते भिंतीवरसुद्धा चित्र रेखाटायचे. त्यांचे बालपण खूप कठीण होते. ते आपल्या वडिलांना पहाटे वृत्तपत्र वाटण्यात मदत करत असे, आणि जमेल त्या वेळात ते चित्रकला करत असत.
वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी स्वत: ची एक व्यंगचित्र कंपनी उघडली, परंतु त्यांचे एकही व्यंगचित्र विकले गेले नाही आणि पैशाअभावी त्यांच्याकडे भाड्याने आणि खाण्यापिण्यासाठी पैसेही नव्हते. म्हणून त्यांना आपल्या मित्रांसोबत राहावे लागले होते. वयाच्या २२ व्या वर्षापर्यंत त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी पैसे नव्हते, परंतु त्यांनी आयुष्यात कधीच माघार घेतली नाही.
त्यांना सर्वत्र निराशा मिळाली, अगदी आळशी आणि निरुपयोगी म्हणून त्यांना वृत्तपत्रातून काढून टाकले होते. त्यांनी आयुष्यात कधीच माघार घेतली नाही. भावाकडून पैसे घेत त्यांनी लवकरच प्रसिद्ध द वॉल्ट डिझनी कंपनी तयार केली, आणि त्यात काही लोक कामाला ठेवले. सन १९२८ ला डिझनी न्यूयार्क ते कॅलिफोर्निया या ट्रेन प्रवासात होते, तेव्हा त्यांनी त्या प्रवासात वेगवेगळी चित्रे काढायला सुरुवात केली, आणि एक उंदराचे चित्र काढले, त्या चित्राला त्यांच्या पत्नीने मिकी हे नाव दिले, आणि त्या चित्राला त्यांनी आवाज दिले, त्यानंतर हे चित्र एवढे प्रसिद्ध झाले की, त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. संपूर्ण जगातून ९५० पेक्षाही जास्त पुरस्कार मिळवले.
अमेरिकेत त्यांना सांस्कृतिक प्रतीक म्हणून ओळखले जाते. कारकीर्दीत त्यांना वेगवेगळ्या ऑस्कर पुरस्कार प्रकारांसाठी ५९ नामांकन प्राप्त झाले होते. ज्यामध्ये त्यांनी हा पुरस्कार २२ वेळा जिंकला आहे. इतक्या वेळा हा पुर्कार जिंकणारे ते एकमेव व्यक्ती आहेत. पुरस्कार जिंकण्यात त्यांच्यानंतर संगीतकार एलफर्ड न्यूमॅन यांचा क्रमांक लागतो, ज्यांनी एकूण नऊ ऑस्कर पुुरस्कार जिंकले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-