जर भावनांना हात घालणारे, डोळ्यांत नकळत पाणी आणणारे चित्रपट तुम्हाला आवडत असतील, तर ‘होमबाउंड’ तुमच्यासाठीच आहे. शक्तिशाली कथा, संवेदनशील दिग्दर्शन आणि शब्दांपेक्षा अभिनयातून अधिक सांगणाऱ्या फ्रेम्स—हा चित्रपट पाहताना अनेक प्रेक्षकांना दिवंगत इरफान खानची आठवण येते. विशेषतः विशाल जेठवाचे भावपूर्ण डोळे आणि संयत अभिनय इरफानच्या प्रभावी शैलीची आठवण करून देतात. ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor)यांनीही दमदार कामगिरी करत कथेला बळ दिले आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवांत मिळालेल्या दादीनंतर ‘होमबाउंड’ आता ऑस्करमध्ये इतिहास रचण्यास सज्ज आहे.
कथा दोन बालमित्रांभोवती फिरते—मोहम्मद शोएब (ईशान खट्टर) आणि चंदन कुमार (विशाल जेठवा). दोघेही पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. मात्र समाजातील जुने अडथळे—धर्म आणि जात—त्यांच्या वाटेत वारंवार उभे राहतात. शोएबला धार्मिक ओळखीमुळे रोखले जाते, तर चंदनला जातीमुळे. या संघर्षात सुधा भारती (जान्हवी कपूर) आशेचा किरण ठरते; अडचणी असूनही मोठी स्वप्ने पाहणारी ही व्यक्तिरेखा कथेला मानवी उंची देते.
चित्रपटाला IMDb वर 8 रेटिंग मिळाले असून तो वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या हिंदी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नसले, तरी समीक्षक आणि प्रेक्षकांकडून ‘होमबाउंड’ला प्रचंड प्रशंसा मिळाली आहे; OTT वरही प्रतिसाद सकारात्मक आहे.मसान’ सारखा गाजलेला चित्रपट देणारे नीरज घायवान यांनी ‘होमबाउंड’चे दिग्दर्शन केले आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट 26 सप्टेंबर 2025 रोजी भारतात प्रदर्शित झाला.
78 व्या कान्स चित्रपट महोत्सवात Un Certain Regard विभागात निवड झाल्यानंतर, प्रदर्शनानंतर जवळपास नऊ मिनिटे उभे राहून टाळ्यांचा कडकडाट झाला. टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) 2025 मध्ये सादरीकरणात दाखवला गेला आणि People’s Choice International पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट होत दुसरा उपविजेता ठरला. आणि होमबाउंड’ला 98व्या अकादमी पुरस्कारांमध्ये Best International Feature Film श्रेणीसाठी भारताची अधिकृत नोंद मिळाली आहे.ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर अभिनीत ‘होमबाउंड’ 21 नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगला आला असून सध्या तिथेच उपलब्ध आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या चौथ्या सीझनची झलक समोर, पहिला एपिसोड दिसणार देसी गर्ल










