Saturday, January 31, 2026
Home बॉलीवूड ‘ओ’रोमियो’नंतर शाहिद कपूर ‘कॉकटेल 2’मध्ये झळकणार, शूटिंग संपताच सेटवर सेलिब्रेशन

‘ओ’रोमियो’नंतर शाहिद कपूर ‘कॉकटेल 2’मध्ये झळकणार, शूटिंग संपताच सेटवर सेलिब्रेशन

अभिनेता शाहिद कपूर सध्या ‘ओ’रोमियो’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 13 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असला, तरी रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे. मात्र याचदरम्यान शाहिदच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शाहिद कपूरने आपला आणखी एक मोठा प्रोजेक्ट पूर्ण केला असून तो लवकरच ‘कॉकटेल 2’ मध्ये दिसणार आहे.

शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृति सेनन (Kriti Sanon)यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘कॉकटेल 2’च्या शूटिंगचा शेवट झाला आहे. चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

होमी अदजानियाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये शाहिद कपूर, कृति सेनन आणि रश्मिका मंदाना केक कापताना दिसत आहेत. या फोटोसोबत त्यांनी ‘कॉकटेल 2’चे शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली.

पोस्टमध्ये होमी अदजानिया लिहितात, “कॉकटेल 2 चे शूटिंग पूर्ण झाले आहे. कदाचित मी थोडा पक्षपाती असेन, पण हे प्रोजेक्ट खास वाटत आहे. माझी जबरदस्त टीम आणि कलाकारांचे मनापासून आभार, ज्यांनी माझ्या या वेड्या प्रवासाला साथ दिली. सर्वांना खूप सारा प्रेम.”

होमी अदजानियाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कृति सेननने कमेंट करत लिहिले, “लव्ह यू, होम्स्टर.” तर रश्मिका मंदानानेही लिहिले, “होम्स्टर! तुम्हाला खूप सारा प्रेम.” दिग्दर्शिका जोया अख्तरने हार्ट आणि टाळ्यांच्या इमोजींसह आपली प्रतिक्रिया दिली. पोस्ट व्हायरल होताच अनेक चाहत्यांनी दिग्दर्शकाकडे चित्रपटाचा टीझर लवकर रिलीज करण्याची मागणी केली आहे.

‘कॉकटेल 2’ मध्ये शाहिद कपूर, कृति सेनन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अर्जुन रामपाल, डिंपल कपाडिया आणि रोहित सराफ हे कलाकारही चित्रपटाचा भाग असतील. हा चित्रपट 2012 साली आलेल्या ‘कॉकटेल’चा सिक्वेल आहे. पहिला भाग दीपिका पादुकोणसाठी करिअर टर्निंग पॉइंट ठरला होता आणि प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे ‘कॉकटेल 2’कडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

‘बॅटल ऑफ गलवान’मधील रोमँटिक लूकवरून ट्रोलर्सना सलमान खानने दिले चोख उत्तर; म्हणाला, ‘त्यांनीही तसेच…’

हे देखील वाचा