Friday, December 20, 2024
[aioseo_breadcrumbs]

हनी सिंगने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी दिले चाहत्यांना अनोखी भेट, सोशल मीडियावर केली पोस्ट शेअर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक, रॅपर आणि संगीत दिग्दर्शक यो यो हनी सिंग आज त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी त्याने त्याच्या चाहत्यांना खास भेट दिली आहे. हनी सिंगचे आयुष्य नेहमीच मीडियामध्ये गाजले. त्याचे वैयक्तिक जीवन असो किंवा व्यावसायिक प्रत्येक गोष्टींची तुफान चर्चा झाली. खासकरून त्याचे वैयक्तिक आयुष्य तर त्याला जास्त प्रसिद्धी मिळवून देणारे ठरले. आज हानी सिंगने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक गोष्ट सर्वांसोबत शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

लवकरच हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित एक डॉक्युमेंटरी येणार आहे. याच डॉक्युमेंटरीचा टिझर आज त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून, त्याचा या दोघांनी मिळवून इंस्टाग्रामवर त्याचा टिझर शेअर केला आहे. या टिझर व्हिडिओमध्ये हनी सिंग परफॉर्म करत असून, समोर बसलेले प्रेक्षक त्याला चियर करत आहे. हनी सिंग म्हणतो, “हे जे माझे आयुष्य देवाने बनवले आहे, आणि यात जो खोलपणा आहे, याने मला स्वतःची आठवण करून दिली आहे. काही अशाच गोष्टी मी सांगितल्या आहेत. माझा गल्ला तोडला मी त्यासाठी. सवय सोडल्या मी माझ्या, आता बोलू नका हानी सिंग आजारी आहे माझी डॉक्युमेंटरी तयार आहे.”

रॅपर हनी सिंगच्या जीवनावर आधारित असलेल्या या डॉकुमेंटरीचे दिग्दर्शन मोजेज सिंगने केले असून याची निर्मिती ऑस्कर पुरस्कार प्राप्त गुनीत मोंगा यांनी केली आहे. या डॉक्युमेंटरीमधून लोकांना हनी सिंगचा प्रवास दिसणार आहे, तो कसा भारतातील सर्वात मोठा रॅपर बनला. त्यानंतर तो आजारी झाला आणि गायब झाला. दरम्यान हनी सिंगने २००३ साली पंजाबी रॅपरच्या रूपात या क्षेत्रात प्रवेश केला आणि धमाल केली. पुढे त्याचे ‘ब्राउन रंग’, ‘देसी कलाकार’, ‘ब्लू आईज’ आदी अनेक गाणी तुफान गाजली. चित्रपटांमध्ये देखील त्याने रॅप सॉन्ग गायले आहे. २०१५ साली तो अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नवऱ्यालाच शिकव म्हणजे झालं….,’ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा सून शिवानी रांगोळे हिला मजेशीर सल्ला
2 वर्षात 100 ट्यून बनवल्या, पण 9 च सिलेक्ट झाल्या; चित्रपटातील गाणी आणि नृत्याने रचला इतिहास

हे देखील वाचा