Wednesday, July 3, 2024

यो यो हनी सिंगने केला आई- वडिलांचा वाढदिवस साजरा, फोटोला मिळाले ४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स

बॉलिवूडमधील प्रसिद्ध पॉप सिंगर म्हणजेच यो यो हनी सिंग, त्याच्या गाण्यांची जादू सर्व तरुण वर्गावर आहे. सोशल मीडियावर देखील त्याचा प्रचंड चाहतावर्ग आहेत. सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट शेअर करताच चुटकीसरशी ते सर्वत्र व्हायरल होत असते. नुकताच यो यो हनी सिंगने त्याच्या आई- वडिलांच्आ लग्नाचा 39 वा वाढदिवस साजरा केला आहे. यानिमित्त त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्याच्या सगळ्या चाहत्यांना त्याचे हे फोटो खूप आवडले आहेत. फोटोवर सगळे लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या फोटोंमध्ये पहिला फोटो त्याच्या आई- वडिलांसोबतचा आहे. यात हनी सिंगचे वडील त्याच्या आईला केक चारताना दिसत आहेत. या फोटोंचे बॅकग्राउंड पाहता ते कोणत्या तरी हॉटेलमध्ये गेले आहेत हे लक्षात येते. दुसऱ्या फोटोत हनी सिंगचा संपूर्ण कुटुंबासह दिसत आहे.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना एकत्र जेवणाची संधी मिळाली. तिसऱ्या फोटोमध्ये हनी सिंग त्याच्या आई- वडिलांना गिफ्ट देताना दिसत आहे. हनी सिंगने शेअर केलेल्या या फोटोला 4 लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत आणि 1200 पेक्षाही जास्त कमेंट्स मिळाल्या आहेत.

हनी सिंगचे सिंहस्टा सोबतचे ‘मॉडर्न रांझा’ हे गाणे नुकतेच रिलीझ झाले आहे. त्याचे हे गाणे देखील नेहमी प्रमाणे मोठ्या प्रमाणत व्हायरल झाले आहे. इंडस्ट्रीपासून बरेच दिवस लांब राहिल्यानंतर हनी सिंगने दमदार पुनरागमन केले आहे.

याआधी देखील हनी सिंगने अनेक गाणी आणि रॅप केले आहेत. त्याचे ‘ब्ल्यू आईज’ हे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. तो साँग कंपोजर देखील आहे. बॉलिवूडमध्ये त्याने गाणी केली होती. तरुणांच्या गळ्यातील ताईत अशी त्याची ओळख आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘देसी क्वीन’ सपना चौधरीने केले हटके अंदाजात फोटोशूट, सिल्व्हर ज्वेलरीने खुलले सौंदर्य

-अरे व्वा! प्रेक्षकांना खदखदून हसवणाऱ्या कपिल शर्माने केले आपल्या मुलाचे नाव जाहीर, वाचा काय ठेवलंय नाव?

-‘संधी मिळेल तिथे डान्स करा!’, केरळच्या मेडिकल स्टुडंट्सनी लावले ‘या’ गाण्यावर ठुमके, पाहा जबरदस्त व्हिडिओ

-एकदम कडक! ‘टॉप टकर’ गाण्यावर थिरकली ‘नॅशनल क्रश’, वाढदिवसानिमित्त व्हिडिओची सोशल मीडियावर धमाल

हे देखील वाचा