हाँगकाँगमधील एका प्रसिद्ध माॅडेलची वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी हत्या झाली आहे. अॅबी प्रसिद्ध माॅडेलसह साेशल मीडिया एन्फ्लुएन्सर हाेती. गेल्या काही दिवसांपासू अॅबी चाेई बेपत्ता हाेती, ज्यानंतर तिच्या घरातच तिच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. माॅडेलच्या घरातील फ्रीजमध्ये ठेवलेल्या सूप पाॅटमध्ये अॅबीचं डाेकं तरंगताना दिसले, तर तिचं धडही गायब असल्याची माहिती समोर आली आहे.
ज्या घरता माॅडेलचं डाेकं सापडलं, ते घर अॅबीच्या पूर्वाश्रमीच्या सासऱ्यांनी भाड्याने घेतलं होतं. माध्यमातील वृत्तांनुसार, शरीराच्या अवयावांसह हत्या करणारे अवजार आणि कपडे सापडले आहेत. याप्रकरणी पाेलिसांंनी माॅडेलचा पूर्वाश्रमीचा पती अॅलेक्स क्वांग, सासरा क्वांग काऊ आणि एक नातेवाईक अँथनी क्वांग यांना ताब्यात घेऊय हत्येच्या आराेपाखाली काेर्टात हजर केले.
माध्यमातील वृत्तांनुसार, माॅडेलच्या हत्येचा संबंध तिचा एक्स पती आणि त्याच्या कुटुंबातील आर्थिक वादाशी आहे. अॅबीच्या कुटुंबातील लाेक तिच्या आर्थिक व्यव्हारावर नाखूष असल्याचंही समाेर येत आहे. या धक्कादायक घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. अॅबीचा सोशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे. पहिल्या घटस्फोटानंतर माॅडेलने चेन रेस्टॉरंटच्या संस्थापकाचा मुलगा ख्रिस टॅमशी दुसरं लग्न केलं होतं. मात्र, अॅबी पूर्वीच्या सासरच्या मंडळींच्या नावाने विकत घेतलेली प्राॅपर्टी विकण्याच्या तयारीत होती आणि त्यामुळेच त्यांनी माॅडेलचा खून केल्याची चर्चा आहे.(hong kong models abby choi murder)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री
कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…