Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धार्थ गेल्यानंतर शहनाझला पहिल्यांदाच मिळालं हसण्याचं कारण, आली ‘ही’ आनंदाची बातमी

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची माहिती समोर आली, तेव्हा सगळेच स्तब्ध झाले होते. एक चमकणारा तारा अशा प्रकारे अदृश्य होईल यावर कोणीही विश्वास ठेवू शकला नाही. सिद्धार्थच्या निधनानंतर चाहते पुर्णपणे तुटले आहेत. त्याचबरोबर शहनाझ गिल देखील खूप वाईट अवस्थेतून जात होती. पण ती अलीकडेच शूटिंगवर परतली होती. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आतापर्यंत शहनाझ जिथे जिथे दिसली, तिथे तिच्या चेहऱ्यावर फक्त निराशा दिसली आहे. तिच्या ‘हौंसला रख’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही शहनाझ खोटे स्मितहास्य करताना दिसली होती. पण आता सिद्धार्थच्या जाण्यानंतर शहनाझला पहिल्यांदा हसण्याचे कारण मिळाले आहे. तिच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करून सर्व विक्रम मोडले आहेत.

कधी प्रदर्शित झाला शहनाझचा चित्रपट?
दिलजीत दोसांझ आणि शहनाझ गिल यांच्या ‘हौंसला रख’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. १५ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पंजाबी चित्रपटांचे बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडले आहेत. दसऱ्याच्या एक दिवस आधी चित्रपटाची एकूण कमाई सुमारे २ कोटी रुपये होती. साहजिकच हा चित्रपट लुधियाना, दिल्ली, चंदीगड आणि अमृतसरमध्ये हाऊसफुल्ल होता.

११ कोटीचा आकडा केला पार
या चित्रपटाने शुक्रवारी ५.१५ कोटी रुपये जमा केले आणि शनिवारी ५.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशा प्रकारे रविवारपर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन सुमारे १२ कोटी रुपये झाले आहे. दिलजीत दोसांझ सतत चित्रपटाबद्दल प्रतिसाद आणि रिव्ह्यू शेअर करत आहे.

रेकॉर्ड ब्रेकिंग चित्रपट
चित्रपटाच्या पोस्टर आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनचा तपशील शेअर करताना अभिनेत्याने सोशल मीडियावर लिहिले की, ‘हौंसला रख’ वीरेने सर्व पंजाबी चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आंतरराष्ट्रीय संग्रह क्रमांकही शेअर केले आणि त्याला कॅप्शन दिले की, “हौसला रख’ या आठवड्याच्या शेवटी उत्तर अमेरिकेत बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडून टाकेल.”

आयएमडीबीवर मिळाली बरीच रेटिंग
चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन व्यतिरिक्त, त्याला मिळत असलेल्या रेटिंग आणि रिव्ह्यूबद्दल बोलायचे झाले, तर बहुतेक समीक्षकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. चाहत्यांनी आयएमडीबीवर १० पैकी ९.५ रेटिंग दिली आहे. एका नेटकऱ्यांनी आयएमडीबीवर लिहिले की, “शहनाझ गिल बेबी यू जस्ट नेल्ड इट नेल्ड यू रॉक इट बेबी. तुझी एक्स्प्रेशन उत्कृष्ट होती, तू ज्या प्रकारे स्वीटीचे पात्र साकारले आहे ते कौतुकास्पद आहे. लव्ह यू शहनाझ.”

माध्यमांतील वृत्तानुसार, हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांच्या लांब रांगा लागल्या होत्या.  चित्रपट विकेंड संपताच ६ कोटींचा व्यवसाय करेल.

दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अधूरा’चा फर्स्ट लूक रिलीझ: शेवटचे एकत्र दिसणार ‘सिडनाझ’, चाहत्यांना अनावर झाल्या भावना

-शहनाझ गिलपेक्षा तिचा ‘मुलगा’च आहे अधिक गोड, क्यूटनेसमध्ये तैमूर-इनायालाही देतोय जोरदार टक्कर

-शहनाझ गिलचा चेहरा पाहून चाहत्यांना जाणवली उदासीनता, व्हिडिओ पाहून करतायत विचारपूस

हे देखील वाचा