Monday, July 1, 2024

शहनाझ गिलचा चेहरा पाहून चाहत्यांना जाणवली उदासीनता, व्हिडिओ पाहून करतायत विचारपूस

या वर्षी सिनेसृष्टीतून आलेल्या एका बातमीने अनेकांना दुःख झाले होते, ती बातमी म्हणजे ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा मृत्यू. या बातमीनंतर त्याचे सगळे चाहते खूप नाराज झाले होते. यासोबत सिद्धार्थची सगळ्यात जवळची मैत्रीण शहनाझ गील देखील धक्क्यात होती. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर ती सोशल मीडियापासूनच नाही, तर तिच्या कामापासून देखील लांब गेली होती. यामुळे तिच्या घरच्यांना आणि मित्रांना तिची खूप काळजी वाटत होती. तब्बल एक महिन्यापर्यंत सगळ्या जगापासून लांब असलेली शहनाझ आता हळूहळू सामान्य आयुष्यात परत यायला लागली आहे. यावेळी ती तिचा आगामी चित्रपट ‘हौसला रख’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच दिलजीत दोसांझ आणि शहनाझचा एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, शहनाझ गिल ‘हौसला रख’ या चित्रपटातील तिचा को-स्टार दिलजीत दिसांझसोबत दिसत आहे. तिने पोल्का डॉट ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस आणि एंकल लेंथ बुट्स घातले आहे. शहनाझला पाहून तिचे काही चाहते खुश, तर काही भावनिक झाले आहेत. काहीजण तिच्या हिमतीचे कौतुक करत आहेत. (Honsla rakh shehnaaz gill makes second appearance with Diljit Dosanjh fans hoy emotional after watching this video)

या व्हिडिओमध्ये शहनाझच्या चेहऱ्यावर निराशा साफ दिसत आहे. परंतु तरीही ती हसण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तिच्या डोळ्यातील उदासपणा स्पष्ट दिसत आहे. शहनाझची ही अवस्था‌ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान झाली होती. या व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, “या मुलीत आमचा जीव अडकतो.” आणखी एकाने लिहिले आहे की, “देव तुला सुखात ठेवो, तुला शक्ती आणि आनंद मिळो.” याव्यतिरिक्त दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “धाडसी मुलगी.”

मागील काही दिवसात शहनाझ आणि दिलजीतने सोबत हा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेसचा आहे. ‘हौसला रख’ हा चित्रपट (१५ ऑक्टोबर) दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\

-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

-आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद

हे देखील वाचा