Wednesday, July 3, 2024

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर कामावर परतलीय शहनाझ गिल? दिलजीत दोसांझने शेअर केलेला व्हिडिओ

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर अभिनेत्री शहनाझ गिल पुर्णपणे तुटली होती. सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारादरम्यान काही फोटो व्हायरल झाले होते ज्यात शहनाझ खूप रडताना दिसली. सिद्धार्थच्या मृत्यूच्या एक महिन्यानंतर शहनाझ आता स्वतःची काळजी घेत कामावर परतली आहे. शहनाझ लवकरच दिलजीत दोसांझसोबत ‘हौंसला रख’ या पंजाबी चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्याने सांगितले होते की, ती लवकरच कामावर परतणार आहे. आता शहनाझ कामावर परत आली आहे. अशातच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिलजीत दोसांझने व्हिडिओ केला शेअर
गायक दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याच्यासोबत शहनाझ आणि सोनम बाजवा दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिलजीत आणि सोनम एका सीनचा संवाद साधताना दिसत आहेत. हा सीन त्यांच्या ‘हौंसला रख’ या चित्रपटातील आहे. त्यानंतर शहनाझची सीनमध्ये एन्ट्री होते आणि ती दिलजीतला टेडी बियरने मारू लागते. व्हिडिओच्या शेवटी, शहनाझ आणि सोनम दोघेही दिलजीतला मारल्यानंतर हसताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये शहनाझने पोल्का डॉट्स ड्रेससह उंच बूट घातलेला दिसत आहे.

शहनाझचे चाहते झाले आनंदी
शहनाजचे चाहते दिलजीतच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “शहनाझ खूप सुंदर दिसत आहे.” त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, “शहनाझ तुला खूश पाहून मी पण खुश झालो. या व्हिडिओसाठी दिलजीत आणि सोनमचे आभार.” शहनाझच्या व्हिडिओला इंस्टाग्रामवर आत्तापर्यंत १ लाख ५५ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच, सना परतल्याबद्दल आनंद व्यक्त करणारे चाहते हृदय आणि आग इमोजी पोस्ट करताना दिसले आहेत.

https://www.instagram.com/p/CUcVi4hsLdy/?utm_source=ig_web_copy_link

‘हौंसला रख’ १५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिलजीतसोबत शहनाझ आणि सोनम बाजवा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालचा मुलगाही या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि एक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. पण शहनाझ अजून त्याच्या प्रमोशनचा भाग बनली नव्हती. आता या चित्रपटाबद्दलचा तिचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. शहनाझ ‘हौंसला रख’च्या प्रमोशनल गाण्याच्या चित्रीकरणासाठी कामावर परतली आहे. चित्रपटाच्या निर्मात्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, हे गाणे भारतात किंवा यूकेमध्ये शूट केले जाईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात

-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी

हे देखील वाचा