Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड ‘गंगूबाई काठीयावाडी’ चित्रपटातील कलाकारांनी घेतले तब्बल ‘एवढे’ मानधन, एकदा नजर टाका

‘गंगूबाई काठीयावाडी’ चित्रपटातील कलाकारांनी घेतले तब्बल ‘एवढे’ मानधन, एकदा नजर टाका

मागील अनेक दिवसापासून सर्वत्र एका चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. तो म्हणजे ‘गंगुबाई काठीयावाडी.’ आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असणारा बहु प्रतिक्षित चित्रपट शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी पाहून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे, याची सगळेजण वाट पाहत होते. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शन खाली बनलेला हा चित्रपट काहीतरी भन्नाट असणार याची सगळ्यांना आधीपासूनच कल्पना होती.

ट्रेलरमधील आलिया भट्टच्या लूकने तर सगळ्यांना अगदी वेड लावले. तसेच त्यातील ‘ढोलिदा’ गाणे देखील अनेकांना आवडले. आता एवढा मोठा चित्रपट आणि तगडी स्टारकास्ट असलेले कलाकार म्हणजे त्यांचे मानधन देखील तेवढेच मोठे असणार. चला तर आज जाणून घेऊया ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटातील कलाकारांनी या चित्रपटासाठी किती रक्कम घेतली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी लाख कोटींमध्ये मानधन घेतले आहे. आलिया भट्टने या चित्रपटात गंगुबाई ही मुख्य भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने तब्बल २० कोटी एवढे मानधन घेतले आहे. चित्रपटात अजय देवगणने काही वेळ काम केले आहे. त्याने या भूमिकेसाठी ११ कोटी एवढे मानधन घेतले.

अभिनेते विजयराज या चित्रपटात एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत आहेत. या भूमिकेसाठी त्यांनी १.५ कोटी एवढी रक्कम घेतली. चित्रपटात हुमा कुरैशी छोट्याशा परंतु महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेसाठी तिने तब्बल २ कोटी रुपये आकारले.

अभिनेता आणि डान्सर शंतनु महेश्वरी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. त्याने चित्रपटातील छोट्याशा भूमिकेसाठी ५० लाख रुपये एवढी रक्कम घेतली. अभिनेत्री सीमा पाहवा यांनी या चित्रपटासाठी २०लाख रुपये घेतले. तसेच अभिनेता तारीख अहमद खानने या चित्रपटासाठी १५ लाख रुपये रक्कम घेतली.

‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटाची कहाणी सत्य घटनेवर आधारीत आहे. वैशा व्यवसायावर आधारलेला हा चित्रपट आहे. वैशा व्यवसायातून ती कशाप्रकारे सामाजिक सेवेकडे वळते हे या चित्रपटात दाखवले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा