Monday, July 1, 2024

देवाघरी गेलेल्या बप्पी दांकडे किती रुपयांचं सोनं होतं? आकडा वाचूनच येईल आकडी

बप्पी लहिरी हे नाव ऐकताच एक जाडजूड देह, डोळ्यावर गॉगल, गळ्यात सोन्याच्या चेन्स, हातात सोन्याचे ब्रेसलेट्स आणि माईकवर डिस्को साँग्स या गोष्टी डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत. बप्पी दा १६ फेब्रुवारी, २०२२ रोजी आपल्यातून गेले. त्यांना जितकी आवड वेगवेगळी डिस्को सॉंग्स गाण्याची होती, तितकीच सोन्याच्या दागिन्यांचीही होती, हे तर आपल्याला माहितच आहे, पण सोन्याच्या दागिन्यांमध्ये मढलेल्या बप्पीदांचं लहानपण तितकं बरं गेलं नाही. त्यांच्याकडे ते लहान असताना सोन्याची एकही चेन नव्हती हे जर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पुढं बप्पीदांनी चिक्कार पैसा कमावला आणि सोन्याच्या दागिण्यांचं भंडारच उभं केलं. किती होतं त्यांच्याकडं सोनं? एकूण किंमत काय होती? चला जाणून घेऊया…

बप्पी दांनी सुरुवातीच्या काळात फारच संघर्ष केला. पश्चिम बंगालच्या जलपायगुडीमध्ये २७ नोव्हेंबर, १९५२ रोजी जन्मलेल्या अलोकेश लहिरी यांना बप्पी दा व्हायला तसा खूपच वेळ लागला. त्यांना संगीताविषयीची आवड बालपणापासूनच होती. वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्यांनी तबला वाजवायला सुरुवात केलेली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. एसडी बर्मन यांची गाणी बप्पी दांना खूप आवडायची. त्यांच्या गाण्यांमुळेच बप्पी दा या इंडस्ट्रीत आले. एसडींच्या गाण्यांचा बप्पी दा नियमित रियाजही करायचे. त्यांनीच संपूर्ण देशाला डिस्को सॉंग्सची ओळख करून दिली.

प्रत्येक व्यक्तीला कुणी ना कुणी सिंगर आवडत असतो, तसंच काहीसं बप्पीदांचंही होतं. हॉलिवूड गायक एल्विस प्रेस्ली बप्पी दांना खूप आवडायचा. त्याची गळ्यात सोन्याची चेन घालण्याची सवय त्यांना खूप आवडत होती. मात्र, त्यांच्याकडे सुरुवातीच्या काळात पैसे नसल्यामुळे त्यांना ती चेन घेण्याचे परवडत नव्हते. पण जेव्हा त्यांच्याकडे पैसे यायला सुरुवात झाली, तेव्हा मात्र, त्यांच्याकडे सोन्याचे दागिणेच दागिणे झाले. हे सोन्याचे दागिने त्यांनी घालायला सुरुवात केली. एका मुलाखतीत बप्पी दा म्हणाले होते, “मी एक यशस्वी व्यक्ती बनल्यावर स्वतःची वेगळी ओळख तयार करेल. त्यामुळे माझ्याकडे जेव्हा पैसे आले, तेव्हा मी एवढं सोनं खरेदी करू शकलो. सोनं माझ्यासाठी लकी आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bappi Lahiri (@bappilahiri_official_)

बप्पी दांनी सांगितल्याप्रमाणे ते एक यशस्वी व्यक्ती, तर झालेच शिवाय त्यांनी अंगावर भरपूर सोनं घालण्याची हौसही पूर्ण करून घेतली. त्यांच्या अंगावरचं सोनं नेमकं किती असेल? त्याची एकूण किंमत काय असेल? अंगावर जर एवढं सोनं घालत असतील तर त्यांच्या घरात किती सोनं असेल? सोनंच एवढं आहे, तर त्यांच्याकडे असलेल्या प्रॉपर्टीची किंमत काय असेल? यांसारखे एक ना अनेक प्रश्न असंख्य लोकांच्या मनात होते. बप्पी लहरींकडे ४० लाख रुपयांचं सोनं होतं. ते जिथे कुठे जायचे, तिथे लाखो रुपयांचं सोनं घालूनच जायचे. त्यांच्याकडे अजूनही ७५२ ग्रॅम सोनं आणि ४.६२ किलो चांदी आहे. आता आजच्या बाजारभावाप्रमाणे तुम्हीच या सगळ्याच्या किमतीची कल्पना करा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bappi Lahiri (@bappilahiri_official_)

त्यांनी जेव्हा २०१४ ला लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या एकूण मालमत्तेची सगळी माहिती दिली होती. त्यांनीच एके ठिकाणी सांगितल्यानुसार त्यांची मालमत्ता एकूण २० कोटी होती. सोन्याच्या दागिन्यांची आवड जर बप्पी दांनाच एवढी होती, तर त्यांच्या पत्नीला म्हणजे चित्रानीला सोन्याची आवड नसेल का? चित्रानीलाही बप्पी दांएवढीच सोन्याची आवड होती. तिच्याकडे ९६७ ग्रॅम सोनं आणि ८.९ किलो चांदी आहे. याशिवाय तिच्याकडे ४ लाख रुपयांचे हिरेदेखील आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
सिनेमात काम करण्यासाठी ‘पंजाबी कुडी’ रिचाला आई-वडिलांनी दिलेला ‘हा’ महामंत्र, आज बनलीय बॉलिवूड स्टार
देसी गाण्यांवर व्हिडिओ बनवून भारतीयांचं लक्ष वेधून घेणारे ‘हे’ फॉरेनर्स आहेत तरी कोण? जाणून घ्याच
लग्न, मुलं-बाळं होऊनदेखील साऊथच्या ‘या’ कलाकारांचे बाहेर होते अफेअर; यादीत बडे ऍक्टरही सामील

हे देखील वाचा