Tuesday, July 23, 2024

आपल्या युनिक हेयरस्टाईलमुळे ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री साधना यांच्या या स्टाइलमागे देखील आहे एक किस्सा

बॉलिवूडमधील सुवर्ण काळ म्हणून ६०, ७० आणि ८० चे दशक ओळखले जाते. या ती दशकांमध्ये बॉलिवूडमध्ये अनेक उत्तमोत्तम सिनेमे बनले, अनेक उत्तोमोत्तम अभिनेत्री आणि अभिनेते आले यासोबतच दिग्दर्शक, संगीतकार, गायक एकूणच काय तर या तीस वर्षांनी बॉलीवूडला जे काही दिले त्याची पुनरावृत्ती होणे निव्वळ अशक्य आहे. याच दशकात हिंदी चित्रपटांना एक अशी अभिनेत्री मिळाली जिने तिच्या अभिनयासोबतच, सौंदर्य आणि खासकरून हेयर स्टाईलने सर्वांनाच वेड लावले. आज इतक्या वर्षांनी देखील त्या अभिनेत्रींच्या हेयर स्टाईलला सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच महिला कॉपी करताना दिसतात. सर्वांच्याच लक्षात आले असेल आम्ही कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत. हो आम्ही बोलतोय अभिनेत्री साधना (Sadhana) यांच्याबद्दल.

साधना यांचे पूर्ण नाव साधना शिवदासानी होते. जेव्हा साधना यांनी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना त्यांच्या मोठ्या कपाळामुळे काम मिळत नव्हते. मात्र साधना यांना विश्वास होता की एक दिवस त्यांचे कपाळ हीच त्यांची ओळख बनेल. साधना यांनी कधीच हार स्वीकारली नाही. त्या काम मिळवण्यासाठी रोजच विविध स्टुडिओमध्ये जायच्या त्यांना वाटायचे कधी तरी देव त्यांच्यावर द्या दाखवेल आणि त्यांना काम मिळेल. साधना यांच्या वडिलांना देखील हाच विश्वास होता म्हणून ते देखील कधी साधना यांना थांबवत नव्हते. उलट ते साधना यांना मदत करायचे. कारण त्यांना देखील माहित होते की साधना यांना अभिनयाची आवड आहे. त्यांचा हाच संघर्ष त्यांच्या कमी आला आणि त्यांना ४२० सिनेमातील ‘मुड़-मुड़ के ना देख मुड़-मुड़ के’ या गाण्यात ग्रुप डान्ससाठी निवडले गेले.

दरम्यान आताच्या पाकिस्तानमध्ये साधना यांचा जन्म झाला. पुढे त्या संपूर्ण परिवारासोबत मुंबईत आल्या. त्या सायनच्या एका बाराकमध्ये राहायच्या. साधना यांनी त्यांच्या महेनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तोचि अभिनेत्री हे बिरुद मिळवले. लव इन शिमला, परख, असली नकली, हम दोनों, एक मुसाफिर एक हसीना आदी अनेक हिट सिनेमे देऊन त्या सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. त्या त्या काळात सर्वात जास्त फी घेणाऱ्या अभिनेत्री ठरल्या.

साधना यांना नेहमीच एक भीती होती ती म्हणजे त्या कायमच एक जुनियर आर्टिस्ट म्हणूनच नको राहायला. मात्र उशिरा का होईना देव नक्कीच प्रतिसाद देतो. अभिनयाची सुरुवातीपासूनच आवड असणाऱ्या साधना यांनी कॉलेजमध्ये देखील विविध स्पर्धांमध्ये अभिनय केला. कॉलेजमध्ये एकदा अभिनय करताना त्यांना एका सिंधी निर्मात्यांनी पाहिले आणि त्यांना भारताच्या पहिल्या सिंधी सिनेमा असलेल्या ‘अबाना’मध्ये शैला रामानी यांच्या लहान बहिणीची भूमिका देऊ केली. या सिनेमात काम करण्यासाठी त्यांना केवळ एक रुपया मिळाला होता.

एकदा त्यांचा फोटो एका फिल्म मासिकात छापला गेला आणि हाच फोटो त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला. या फोटोवर निर्माते सशाधर मुखर्जी यांची नजर पडली आणि साधना यांचे नशीब पालटले. साधना यांचे कपाळ मोठे होते, म्हणून सशाधर मुखर्जी यांनी त्यांना त्यांची हेयर स्टाईल बदलण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, हेयर स्टाईल अशी पाहिजे की, त्यांचे मोठे कपाळ लपून जाईल. तेव्हा हायर स्टायलिस्टने त्यांना एक नवीन हेयर स्टाईल दिली आणि पुढे हीच हेयर स्टाईल त्यांची ओळख बनली. साधना यांनी अनेक नवनवीन ट्रेंड आणले हेयरस्टाईलसोबतच चुडीदार सलवारची फॅशन देखील त्यांनी आणली. आज देखील साधना यांना फॅशन आयकॉन म्हणून ओळखले जाते. साधना यांची हेयर स्टाईल प्रियांका, जॅकलिन, कॅटरिना अनुष्का या आजच्या अभिनेत्री देखील कॉपी करताना दिसतात.

साधना यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास ‘लव इन शिमला’ या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांचे दिगडसरहक रामकृष्ण नय्यर यांच्यासोबत प्रेम जुळले. त्या दोघांमध्ये सहा वर्षांचे अंतर होते. साधना यांच्या या निर्णयाविरोधात त्यांचे संपूर्ण कुटुंब होते. त्यांची या लग्नाला अजिबात मान्यता नव्हती, म्हणून साधना यांनी राज कपूर यांच्या मदतीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
साराशी ब्रेकअप झाल्यानंतर कार्तिक आर्यनने केला लव्हलाईफचा खुलासा; म्हणाला, ‘मी मागील एक वर्षापासून…’
धनुषच्या ‘या’ सिनेमाचा परदेशातही डंका! बनला अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा तिसरा तमिळ चित्रपट
करीनाच्या ‘या’ गाण्याचे भोजपुरी व्हर्जन चाहत्यांच्या भेटीला, रितेश अन् वर्षाची केमिस्ट्री वेधतेय लक्ष

हे देखील वाचा