बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपली छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच प्रसिद्धीच्या झोकात राहते. ग्लोबल स्टार प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. प्रियांका तिचे फोटो सतत शेअर करत राहते. ज्यात निक जोनास आणि ती एकत्र दिसतात. त्यामुळे नेहमीच चाहत्यांच्या नजरा प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या सोशल मीडियावर लागलेल्या असतात. हे दोघे एकमेकांवरचे प्रेम अनेकदा सोशल मीडियावर उघडपणे व्यक्त करताना दिसतात. त्यामुळेच प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनासकडे रोमँटिक कपल म्हणुन पाहिले जाते.
प्रियांकाने अलिकडेच पती निक जोनाससोबतचा एक प्रचंड रोमँटिक असणारा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत या दोघांच्या प्रेमकथेविषयी सर्वानाच कुतुहल वाटते. प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांचा अतिशय रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. प्रियांकाच्या या पोस्टला चाहत्यांसह तिच्या मित्रांकडून आणि इतर सेलिब्रिटींकडून खूप पसंती मिळत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकरी त्यांच्या प्रेमाचे कौतुक करत आहेत.
प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यात ती पती निक जोनासला अलगदशी मिठी मारताना दिसत आहे. हा फोटो हाय ऍंगलने काढला आहे. या फोटोमध्ये प्रियांकाचा चेहरा तर दिसत आहे, पण निकचा चेहरा ब्लर दिसत असून, त्याची थोडीशी झलक दिसत आहे. चाहते त्या फोटोवर प्रचंड फिदा झाले आहेत. या फोटोमध्ये प्रियंका निकला मिठी मारून हसताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत प्रियांकाने ‘he’s home…’ (तो घरी आहे…) असं एक खास कॅप्शन लिहिलं आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट
-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन