Wednesday, June 26, 2024

हंडा, तेलाचे डब्बे अन् बसण्याचा पाट घेऊन मुलांचा ‘हृदयी वसंत फुलताना’ गाण्यावर भन्नाट व्हिडिओ

आजपर्यंत मराठी चित्रपटसृष्टीने अनेक संस्मरणीय चित्रपट दिले आहेत. ज्यांना आजही विसरणे फारच कठीण आहे. इतकेच नाही, तर त्यातील गाणीसुद्धा सिनेरसिकांच्या तोंडपाठ आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे सन १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अशी ही बनवाबनवी’ होय. या चित्रपटाने तो काळ अक्षरश: गाजवला होता. विशेष म्हणजे सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुप्रिया पिळगावकर यांसारख्या कलाकारांचा यामध्ये समावेश होता. तब्बल ३ कोटी रुपयांचा गल्ला त्यावेळी या चित्रपटाने जमवला होता. या चित्रपटाप्रमाणे यातील ‘हृदयी वसंत फुलताना’ हे गाणंही चांगलंच गाजलं.

हे गाणं ऐकलं की, लहान मुलं तर सोडाच, म्हातारी माणसंही थिरकू लागतात. हे गाणं सर्वाधिक कुठे वापरलं गेलं असेल, तर ते म्हणजे कॉलेज गॅदरिंगला. आजही कॉलेज गॅदरिंगमध्ये या गाण्यावर डान्स होतो. तब्बल ३२ वर्षे उलटून गेली, परंतु आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे.

काही दिवसांपूर्वी या गाण्यावरील दोन छोट्या मुलांचा व्हिडिओ आला होता. यानंतर आता एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. केवळ २७ सेकंदाच्या या व्हिडिओने तुमचा सगळा कंटाळा नक्कीच दूर होईल. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाहीत.

खरं तर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये ८ मुले दिसत आहेत. त्यांची एनर्जी पाहूून तुम्हीही त्यांची प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाहीत. मजेची बाब म्हणजे या मुलांनी घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू घेऊन एका ब्रँड ग्रूपप्रमाणे ‘हृदयी वसंत फुलताना’ गाणं म्हणताना दिसत आहेत. या व्हिडिओत एका मुलाने हातात काहीतरी घेऊन गाणं गात आहे. एक मुलाने तेलाचे रिकामे डब्बे घेऊन त्याची ढोलकी बनवली आहे. दुसऱ्या एका मुलाने बसण्यासाठी वापरला जाणारा पाट घेऊन त्याचा रीड ऑर्गन बनवला आहे, तर आणखी एका मुलाने पाण्याचा हंडा आणि तेलाचा रिकामा डब्बा घेऊन त्याचा तबला बनवला आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्या एका मुलाने एक टप घेऊन त्याचा ताशा बनवला आहे. असेच बाकीच्या मुलांनी छोट्या- छोट्या वस्तू घेऊन ढोल बनवला आहे आणि एक मुलगा नाचताना दिसत आहे.

https://www.facebook.com/100034997491629/videos/513192929857286/

या मुलांनी वेगळ्या अंदाजात सादर केलेले हे गाण्याला खूपच पसंती मिळत आहे. फेसबुकवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ३.५ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. यूट्यूबवरही तब्बल २ कोटींपेक्षाही अधिक सिनेप्रेमींनी हे गाणे पाहिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत उर्वशीने केले ‘असे’ काही, पाहून तुम्हीही म्हणाल ‘जिगरबाज’

-एक- दोन नव्हे, तर ऋतिक रोशन एका वेळेला खातो चक्क ८ समोसे! स्वतः च केला होता खुलासा

-आलिया भट्टच्या लाईव्ह सेशनमध्ये दिसला रणबीर कपूरअन् तो पण विना शर्ट, एकदा पाहाच हा व्हिडिओ

हे देखील वाचा