Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड सेलिब्रेटींना लग्नाच्या खर्चापेक्षा महागडा ठरला घटस्फोट, पोटगीपोटी मोजावे लागले करोडो रुपये

सेलिब्रेटींना लग्नाच्या खर्चापेक्षा महागडा ठरला घटस्फोट, पोटगीपोटी मोजावे लागले करोडो रुपये

बॉलीवूडची चमक धमक, सेलिब्रेटीजचे थाटमाट हे सर्व पाहून सामान्यांना खूप अप्रूप वाटत असते. त्यातही बॉलीवूडचे लग्न म्हणजे डोळे दिपवणारा सोहळाच असतो. बॉलीवूडच्या लग्नांना पाण्यासारखा पैसे खर्च केला जातो. अशा लग्नांच्या चर्चा पुढील अनेक दिवस होतात. मात्र याच बॉलीवूडमध्ये असे काही लग्न आहेत ज्यांना त्यांच्या लग्नाच्या खर्चापेक्षा घटस्फोटाचा खर्च महागात पडला. पाहूया अशाच काही महागड्या घटस्फोटांची नावे.

फरहान अख्तर आणि अधुना अख्तर
अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता फरहान अख्तरने त्याची पहिली पत्नी अधुनाला २०१६ साली घटस्फोट दिला. या घटस्फोटात अधुनाला पोटगी म्हणून मोठी रक्कम मिळाली. रक्कम नक्की किती होती याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नसला तरी रक्कम भरपूर मोठी होती शिवाय अधुनाला फरहानने १० हजार स्केयर फिटचा बंगला सुद्धा दिला होता.

रिचा पिल्लई आणि संजय दत्त
संजय दत्तने १९९८ साली आपल्या दुसऱ्या पत्नीला रिचाला घटस्फोट दिला. सूत्रांनुसार संजय दत्तने रिचाला एकाचवेळी कोणतीही रक्कम दिली नाही. संजय आजतागायत तिचा संपूर्ण खर्च उचलतो. यासोबतच रिचाला संजयने एक सी.फेसिंग फ्लॅट आणि लग्जरी गाडी देखील दिली आहे.

करिश्मा कपूर आणि संजय कपूर
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्यात अनेक वाद झाले. करिश्माने संजयवर अनेक आरोप केले होते. त्यांनी २०१६ साली घटस्फोट घेतला तेव्हा संजयने करिश्माला ७ करोड रुपये, दोन्ही मुलांच्या नावावर १४ करोड रुपयांचे बॉण्ड घेऊन देत एक घर देखील दिले होते.

सैफ अली खान आणि अमृता सिंग
हिंदी सिनेसृष्टीतील बहुचर्चित जोडी म्हणून सैफ अली खान व अमृता सिंग जोडीकडे पहिले जायचे. सैफ आणि अमृताने लग्नाच्या १० वर्षांनी म्हणजेच २००४ घटस्फोट घेतला. त्यावेळी सैफने अमृताला ५ करोड रुपयांची पोटगी दिली होती. ही रक्कम त्यावेळी खूप मोठी होती.

ऋतिक रोशन आणि सुजान खान
ऋतिक रोशन आणि सुजान खान बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक कपल होते. त्यांनी लग्नाच्या १४ वर्षांनी म्हणजेच २०१४ साली घटस्फोट घेतला. तेव्हा ऋतिकने सुजानला ४०० करोड रुपयांची पोटगी दिली होती. हा आतापर्यंतचा बॉलीवूडमधला सर्वात महागडा घटस्फोट होता.

हे देखील वाचा