Friday, July 12, 2024

ऋतिक रोशन आणि सबा आजाद हातात हात घालून फिरताना झाले कॅमेऱ्यात कैद, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा कथित प्रेमकरणामुळे जास्त चर्चेत आहे. सध्या ऋतिक रोशन आणि सबा आजादच्या (Saba Azad) प्रेमप्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अनेक दिवसांपासून दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसत आहेत त्यामुळे या बातम्यांना अधिकृत दुजोरा मिळत आहे. आता पुन्हा एकदा प्रेम करुया खुल्लमखुल्ला म्हणत ऋतिक आणि सबा हातात हात घालून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना जोरदार ट्रोल केले आहे.

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, अभिनेता ऋतिक रोशन सुजैन खानसोबतच्या घटस्फोटानंतर त्याच्या आयुष्यात  खूप पुढे गेल्याचे दिसत आहे. सध्या त्याच्या आणि सबा आजादच्या गोड लवस्टोरीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दोघेही नेहमी एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर  व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा दोघेही खुल्लम खुल्ला कॅमेऱ्यासमोर हातात हात घालून फिरतानाचा फोटो समोर आला आहे. दोघेही विमानतळावर एकत्र दिसून आले होते. यावेळी ऋतिकने सबाचा हात घट्ट पकडल्याचे दिसत आहे. या व्हायरल फोटोची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. याआधीही सबा ऋतिकच्या घरी दिसून आली होती. त्यामुळे दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

या व्हायरल फोटोंमध्ये ऋतिक रोशन पांढऱ्या रंगाच्या टि-शर्टमध्ये दिसून येत आहे. सोबतच त्याने मास्क आणि गॉगल घातल्याचेही दिसत आहे. तर सबानेही मास्क घालून फिरताना दिसत आहे. यावेळी सबाच्या चेहऱ्यावरील खुललेले स्मितहास्य सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र त्यांच्या या व्हायरल फोटोंवरुन नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केले आहे. त्यावेळी काही जणांनी “लहान मुलीला घेऊन फिरतोय” असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे. तर काही जणांनी त्यांच्या वयाच्या अंतराबद्दल बोलताना “मुलगी वाटतेय” म्हणत जोरदार टीका केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-  

राष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने स्पृहाने ऐकवली कुसुमाग्रजांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ कविता

‘या’ चित्रपटांमुळे एक रात्रीत मिळाली दाक्षिणात्य दिग्दर्शकांना पॅन इंडिया ओळख, जाणून घेऊया त्या दिग्दर्शकांबद्दल

स्वतःचे सीन स्वतःच करणाऱ्या अक्षय कुमारने थेट ४६ व्या मजल्यावरून मारली होती उडी, तेव्हा…

 

हे देखील वाचा