एक्शन, थरार आणि रोमांचकारी चित्रपट म्हणून ‘विक्रम वेधा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. हा धमाकेदार ट्रेलर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून प्रेक्षकांचा त्याला जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. त्यामुळेच हा ट्रेलर युट्यूबवर ट्रेंड करताना दिसत आहे.
अभिनेता ऋतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘विक्रम वेधा’ चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रेक्षकांसह अनेकांनी कौतुक केले आहे. बॉलिवूडमधून
सारा अली खान, आलिया भट्ट, झोया अख्तर, सोनाक्षी सिन्हा, वाणी कपूर, विकी कौशल, अभिषेक बच्चन, करीना कपूर-खान, राकेश रोशन, या कलाकारांनी ट्रेलरचे कौतुक केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा – ‘चल छैया छैया’ गाण्यावर अर्जुने दिली मलायकाला साथ, डान्स व्हिडिओ व्हायरल
सोनाली फोगाटच्या समर्थनार्थ सरसावले ‘हे’ कलाकार, सखोल चौकशीची केली मागणी
लग्नात गाणे गाऊन मुकेश यांना मिळाली चित्रपटात गाण्याची पहिली संधी, मोतीलाल यांनी दिली दिशा