Wednesday, June 26, 2024

सुपरस्टार ऋतिक रोशनने ‘फायर’ गाण्यावर डान्स करत स्टेजवर लावली आग, थ्रोबॅक व्हिडिओला २ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

बॉलिवूडचा प्रसिद्ध सुपरस्टार ऋतिक रोशन याने ‘कहोना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूड जगात पाऊल ठेवले होते. आजही लाखो मुली त्याच्यावर फिदा आहेत. त्याच्या उत्त्तम अभिनयाने त्याने त्याचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. अभिनयाबरोबर त्याच्या सुंदर डान्समुळेही तो प्रसिद्ध आहे. कलाकार बर्‍याचदा पुुरस्कार सोहळ्यामध्ये डान्स करताना दिसत असतात.

ऋतिक रोशनचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो ‘फायर’ गाण्यावर स्टेजवर डान्स करत आहे. ऋतिक रोशनचा हा डान्स व्हिडिओ प्रेक्षकांना आवडत आहे. हा व्हिडिओ आयफा अवॉर्ड २०१६चा आहे.

ऋतिक रोशनचा हा थ्रोबॅक डान्स व्हिडिओ चाहते बरेच पसंत करत आहेत. आयफा अवॉर्ड यूट्यूब वाहिनीवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये ऋतिक रोशन आपली अनोखी डान्स स्टाईल सादर करत आहे. ऋतिक रोशनचा डान्स पाहून तिथे उपस्थित कलाकारही आश्चर्यचकित झाले आहेत. कलाकारांनाही त्याचा हा डान्स करण्याचा अनोखा प्रकार आवडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

ऋतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नुकतेच त्याने त्याच्या पुढच्या ‘फायटर’ चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण असणार आहे. सिद्धार्थ आनंद चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ‘वॉर’ या चित्रपटात ऋतिक  शेवटचा दिसला होता. तो ‘विक्रम वेधा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. चित्रपटात सैफ अली खान पोलिसांची भूमिका साकारणार आहे.

ऋतिकने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामध्ये ‘क्रिश’, ‘क्रिश ३’, ‘जोधा अकबर’, ‘अग्नीपथ’, ‘सुपर ३०’, ‘बँग बँग’, ‘धूम २’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अचंबित! टायगर श्रॉफने खतरनाक स्टंट करत मारली पाण्यात उडी, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना आहे ‘द कपिल शर्मा शो’ची खूप मोठी फॅन, म्हणाली…

-दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन कोरोनाच्या विळख्यात, चाहत्यांसाठी दिला खास संदेश

हे देखील वाचा