Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड ऋतिक रोशनची एक्स पत्नी सुझेन खान करतेय अर्सलान गोनीला डेट? अभिनेत्याच्या पोस्टवर दिले ‘असे’ उत्तर

ऋतिक रोशनची एक्स पत्नी सुझेन खान करतेय अर्सलान गोनीला डेट? अभिनेत्याच्या पोस्टवर दिले ‘असे’ उत्तर

सुपरस्टार ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझेन खान ही सध्या सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनली आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत नेहमी असते. माध्यमांतील वृत्तांनुसार, ती सध्या अली गोनीचा भाऊ अर्सलान गोनीला डेट करत आहे, परंतु दोघांनीही आपल्या नात्याबद्दल अधिकृतपणे घोषणा केलेली नाही.

अलीकडेच सुझेनने आपला वाढदिवस साजरा केला होता. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्सलानने एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्याने तिला “डार्लिंग,” असे म्हटले होते. या पोस्टवर तिची प्रतिक्रिया पाहून आता असे वाटत आहे की, हे दोघे आपले नाते जास्त दिवस कोणापासूनही लपवून ठेवणार नाहीत. (hrithik roshan ex wife sussanne khan comment on arslan goni post did she make her relationship official)

सुझेनने सांगितली ही गोष्ट
अर्सलानने सुझेन सोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…मी प्रार्थना करतो की, तुझे हे वर्ष आणि तुझे आयुष्य चांगले जावो. मला खूप चांगले प्रेम मिळाले आणि हा फोटो खूप सुंदर आहे. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. भरपूर प्रेम.”

सुझेनने अर्सलानच्या पोस्टवर कमेंट केली की, “धन्यवाद, धन्यवाद माझे सर्वकाही.” यासोबतच तिने हार्ट इमोजीही पोस्ट केला. त्या दोघांच्या पोस्ट्स आणि कमेंट्स पाहून असे दिसते की, ते लवकरच सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे खुलासा करणार आहेत. आजच्या काळात बॉलिवूड कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती देताना दिसत आहेत.

Photo Courtesy Instagramarslangoni

अर्सलान हा एक अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटात कामे केले आहेत. तो अली गोनीचा भाऊ आहे. तो सुझेनच्या प्रत्येक पोस्टवर कंमेंट करत असतो. एका पोस्टवर तिला तो “स्पेस गर्ल,” देखील म्हणाला होता.

सुझेन आणि ऋतिक यांचे लग्न २००० मध्ये लग्न झाले होते. तसेच २०१४मध्ये वैयक्तिक कारणांमुळे त्यांचा घटस्फोट झाला होता. दोघे वेगळे होऊन देखील एक चांगले मित्र- मैत्रीण आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांसाठी दोघेही नेहमी एकत्र येतात. लॉकडाऊनमध्येही ते दोघे आपल्या मुलांसाठी एकत्र राहिले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?

-अभिनेत्री नेहा शर्माच्या फोटोसोबत करण्यात आली होती अश्लील छेडछाड, तिनेही फोटो शेअर करत घेतला समाचार

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

हे देखील वाचा