Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड पुन्हा एकदा अर्सलान गोनीसोबत पार्टी करताना दिसली सुजेन खान; अफेयरच्या चर्चांना आलं उधाण

पुन्हा एकदा अर्सलान गोनीसोबत पार्टी करताना दिसली सुजेन खान; अफेयरच्या चर्चांना आलं उधाण

कलाकार जसे यशस्वी होतात, तसे त्यांचे कुटुंब देखील प्रकाशझोतात येते. त्यात जर कलाकार मोठे आणि लोकप्रिय असतील तर सोशल मीडियावर आणि मीडियामध्ये त्यांचे कुटुंब मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होते. या प्रसिद्धीमध्ये कलाकारांनंतर सर्वात आघाडीवर असतात त्या त्यांच्या पत्नी. या पत्नीची लोकप्रियता एखाद्या मोठ्या अभिनेत्रींपेक्षा कमी नसते. अशीच एक स्टार पत्नी म्हणजे सुजेन खान. हँडसम ऋतिक रोशनची पूर्व पत्नी असलेली सुजेन खान खूप लोकप्रिय आहे. तिने ऋतिकची पत्नी याव्यतिरीक्त तिची स्वतःची एक वेगळी ओळख देखील बनवली आहे. सुजेन एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर आहे. तिचा ‘द चारकोल प्रोजेक्ट’ नावाचा एक इंटेरियर स्टुडिओ देखील आहे. २०१४ साली तिने आणि हृतिकने एकमेकांपासून घटस्फोट घेतला. या घटस्फोटनंतरही ते दोघे चांगले मित्र आहेत. सुजेन बऱ्याचदा वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच सुजेनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो एका पार्टीचे असून, यात सुजेनसोबत अर्सलान गोनी, एकता कपूर, रिद्धि डोगरा, मुश्ताक शेख, शबीना खान आदी लोकं दिसत आहे. या फोटोंचे मुख्य आकर्षण म्हणजे यात सुजेनचा कथित बॉयफ्रेंड असणारा अर्सलान गोनी देखील असल्याने, तिचे हे फोटो चांगलेच चर्चेत आले आहे. हे दोघं एकाच सोफ्यावर बसून फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. (sussanne khan arslan goni sussanne khan arslan goni in love)

एका फोटोमध्ये सुजेन खान आणि अर्सलान गोनी यांच्यासोबत शबीना खानदेखील सोफ्यावर बसून पोज देत आहे. मागील अनेक महिन्यांपासून सुजेन आणि अर्सलान गोनी हे एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक बातम्या मीडियामध्ये फार आहे. हे पार्टीचे फोटो पाहिले, तर या फोटोंमध्ये सुजेन खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. साधा मात्र आकर्षक असा पेहराव सुजेनने केला आहे. यात तिने डेनिम शॉर्ट्स स्कर्ट आणि व्हाइट टॉप त्यावर लॉन्ग हाफ बूट्स घातले असून, अर्सलानने सिंपल टी-शर्ट त्यावर डिस्ट्रेस्ड जीन्स आणि स्नीकर्स असा सामान्य पेहराव केला आहे. या दोघांकडून अजून त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये.

ऋतिक आणि सुजेन हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध कपल होते. त्यांनी २००० साली लग्न केले, मात्र २०१४ ला त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना दोन मुलं देखील आहे. मुलांसाठी नेहमीच सुजेन आणि ऋतिक सोबत फिरताना दिसतात. अर्सलान आणि सुजेन सहा महिन्यांपासून डेट करत असल्याच्या बातम्या आहे. अर्सलान एक टीव्ही अभिनेता आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा