यावर्षी अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या स्टार्स किड्सच्या यादीत ऋतिक रोशनची बहीण पश्मिना रोशन देखील सामील आहे. पश्मिना बॉलिवूडमध्ये येणार या बातमीमुळे ऋतिक रोशन खूपच उत्साहित असून त्याने त्याची ही उत्सुकता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. ऋतिक रोशनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या सिनेमाचा टिझर आणि काही फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्याने एक पोस्ट देखील लिहिली आहे.
ऋतिक त्याच्या बहिणीच्या या नवीन सुरुवातीमुळे खूपच खुश आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “हे पाश तुला आठवते का जेव्हा तू कुठेतरी हरवली होती. तुझ्या डोळ्यात मला अजूनही तो शोध आठवतो. शेवटी तू जे ठरवले होते ते तू मिळवलेच. आता तू इंडस्ट्रीमध्ये स्वतःला अढळ करण्यासाठी प्रयत्न कर. जे तू मिळवले ते तू लक्षात ठेव आणि त्याच्यावर अभिमान ठेव. मला तुझ्यावर खूपच गर्व आहे माझी लहान बहीण. या सिनेमाच्या संपूर्ण टीमला आणि पश्मिना तूला खूप खूप शुभेच्छा.”
तत्पूर्वी पश्मिना ही ऋतिक रोशनची चुलत बहीण असून, लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पश्मिनाच्या पहिल्या सिनेमाची अधिकृत घोषणा झाली असून, ती २००३ साली आलेल्या ‘इश्क विश्क’ सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत या सिनेमात रोहित सराफ, नायला ग्रेवाल आणि जिबरान खान मुख्य भूमिकेत असतील. जिबरान २००१ साली आलेल्या ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमात शाहरुख खानच्या मुलाच्या भूमिकेत दिसला होता.
या सिनेमाचे टायटल ‘इश्क विश्क रीबाउंड’ ठेवण्यात आले आहे. याची कथा सोशल मीडियाच्या अवतीभोवती फिरते. यात नात्यानं ऍपच्या माध्यमातून जोडण्याची आणि गमावण्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. २००३ साली आलेल्या इश्क विश्क सिनेमाचा रिमेक आहे. यात शहिद कपूर, अमृता राव, विशाल मल्होत्रा, शेनाज ट्रेसरी हे मुख्य भूमिकेत होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
- BIRTHDAY SPECIAL | रंभाने अभिनय सोडून केले होते लग्न, घटस्फोट आणि आत्महत्येच्या बातम्यांनी वेधले होते लक्ष
- आयफा अवॉर्ड्समध्ये एकट्याने पोहोचलेल्या विक्की कौशलने वैवाहिक आयुष्याबद्दल केला खुलासा, म्हणाला…
- लग्नाच्या तब्बल १२ वर्षांनंतर वेगळे होणार पॉप सिंगर शकीरा अन् जेरार्ड पीके, लव्हस्टोरीही आहे कमाल!