Friday, August 1, 2025
Home अन्य ‘दुसरा कुठला असता तर आतापर्यंत उद्रेक झाला असता’, ऋतिक रोशन प्रकरणाचा वाद पेटला

‘दुसरा कुठला असता तर आतापर्यंत उद्रेक झाला असता’, ऋतिक रोशन प्रकरणाचा वाद पेटला

ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या एका जाहीरातीवरुन सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. या जाहीरातीमध्ये  महाकालजींचे नाव जोडण्यावरून वाद निर्माण झाला आहे. कंपनीची ही जाहिरात अभिनेता हृतिक रोशनने केली आहे. यामध्ये तो थाली का मन किया, उजैन में है तो महाकाल से मंगवा लिया असे म्हणताना दिसत आहे. यावरुनच आता मोठा वाद निर्माण झाला आहे. काय आहे हे संपुर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता ऋतिक रोशनची (Hrithik Roshan) एक जाहीरात सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या जाहीरातीमध्ये चुकीच्या पद्धतीने माहिती प्रसारित केल्याचा आरोप महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी केला आहे. महाकाल मंदिराचे पुजारी म्हणाले, कंपनीने अशा जाहिराती देण्यापूर्वी विचार करायला हवा. हिंदू समाज सहिष्णू आहे, तो कधीही हिंसक नसतो. दुसरा कोणता समाज असता तर आत्तापर्यंत उद्रेक झाला असता अशा कंपनीला आग लागली असती. कंपनीने अशा प्रकारे आमच्या भावनांशी खेळू नये. कंपनीने ही दिशाभूल करणारी प्रसिद्धी केली आहे.

पुजारी म्हणाले, महाकाल मंदिर भोजन परिसरात भाविकांना ताटात अन्न दिले जाते, मात्र ताटातून अन्न पोहोचवण्याची व्यवस्था नाही. जी कंपनी मांसाहारी पदार्थही पुरवत आहे, त्यांनी तात्काळ महाकालच्या नावाने थाळीची दिशाभूल करणारी जाहिरात बंद करावी. कंपनीने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. याला आमचा तीव्र विरोध आहे. कंपनीने माफी मागितली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ.

जिल्हाधिकारी आणि महाकाल मंदिर समितीचे अध्यक्ष यांनी ही जाहिरात तथ्यहीन आणि दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, “महाकाल मंदिरात फक्त भोजनक्षेत्रातच प्रसाद घेता येतो. इथून थाळी कुठेही पाठवली जात नाही. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती रोखण्यासाठी कारवाई करणार. महाकालेश्वर मंदिराच्या भोजनक्षेत्रात दररोज हजारो भाविक अन्नदान करतात. मंदिर समितीतर्फे भोजन व्यवस्था मोफत केली जाते. सकाळी 11 ते 2 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत धान्य परिसरात बसून भाविकांना अन्नदान करता येते.

हेही वाचा –

दोन वर्षांपासून या व्यक्तीची होती अनुष्का सेनेवर नजर; अभिनेत्री म्हणाली, ‘मला काहीच माहित नव्हते’

अभिनेत्री पुजा सावंत ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात? लग्न करण्याची व्यक्त केली इच्छा

बापरे! स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांनाच दिली हॉटेलमध्ये नोकरी करण्याची ऑफर, बिग बींचे उत्तर ऐकून व्हाल थक्क

हे देखील वाचा