Saturday, June 29, 2024

आर्यनसाठी लिहिलेल्या ऋतिकच्या पोस्टवर एक्स पत्नी सुझेन अन् आलिया भट्टची लक्षवेधी कमेंट; तुम्हीही पाहा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अं’मली पदार्थाचे सेवन केल्या प्रकरणी एनसीबीने अटक केली होती. शुक्रवारी (०८ ऑक्टोबर) त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तो सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन या प्रकरणात अडकल्यानंतर त्याचे समर्थन करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार पुढे आले आहेत. ऋतिक रोशनने त्याच्या समर्थनार्थ एक भलीमोठी प्रेरणादायी पोस्ट केली होती. आता या पोस्टवर त्याची पत्नी सुझेन खानने कमेंट केली आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने देखील या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

ऋतिक रोशनने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “ऋतिकने लिहिले की, “प्रिय आर्यन, आयुष्य हा विचित्र प्रवास आहे. हे एकप्रकारे चांगलं आहे, कारण हे अनिश्चित आहे. हे चांगलं आहे, कारण कठीण परिस्थिती येतेच, परंतु देव दयाळू आहे. तो केवळ मजबूत लोकांना संकटात टाकतो. तुम्हाला तेव्हा समजते की, तुमची निवड झाली आहे, जेव्हा तुम्हाला संकटादरम्यान स्वतःला सांभाळण्याचाही दबाव जाणवतो. मला माहिती आहे की, तुला हे आता जाणवत असेल. राग, गोंधळ, सक्ती या सर्व गोष्टी तुझ्यातील नायकाला जाळून टाकेल. मात्र, सावध राहा, त्याच गोष्टी तुझा चांगुलपणा, तुझा दयाळूपणा, करुणा, प्रेम या सर्वांनाही जाळू शकतात.” (Hritik Roshan ex wife Sussanne khan and alia bhatt support shahrukh khan son Aryan khan)

पुढे त्याने लिहिले आहे की, “स्वतःला जळूदे, पण एका मर्यादेपर्यंत… चुका, पराभव, विजय, यश हे सर्व सारखेच आहे. जर तुला माहिती असेल की, कोणता भाग तुझ्याकडे ठेवावा आणि कोणता भाग अनुभवातून बाहेर फेकायचा आहे. परंतु लक्षात ठेव की, या सर्व गोष्टींसह तू अधिक चांगला होऊ शकतो. मी तुला लहानपणापासून ओळखतो आणि मोठा व्यक्ती म्हणूनही ओळखतो. हे स्वीकार, जो काही अनुभव असेल तो स्वीकार. हेच तुझे बक्षीस आहे. विश्वास ठेव. कालांतराने जेव्हा तू या सर्व गोष्टी एकत्र बघशील… मी वचन देतो, तुला सर्व समजेल. जर तू सैतानाच्या डोळ्यात डोकावले आणि शांत राहिला, तर शांत राहा. लक्ष दे. हे क्षण तुझा उद्याचा दिवस घडवत आहेत. उद्या एक तेजस्वी सूर्य चमकत असेल, पण यासाठी तुला अंधारातून जावे लागेल. शांत, स्थिर आणि स्वतःची काळजी घे, प्रकाशावर विश्वास ठेव, तो नेहमी तुझ्या आत आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो यार.”

सुझेनने “एकदम बरोबर,” अशी कमेंट केली आहे. तसेच आलियाने लव्ह इमोजी शेअर केला आहे.

ऋतिक रोशन, सुझेन खान आणि आलिया सोबतच सुनील शेट्टी, सुचित्रा कृष्णमूर्ती, पूजा भट्ट आणि हंसल मेहता यांसारख्या अनेक कलाकारांनी शाहरुख खानच्या मुलाचे समर्थन केले आहे.

रविवारी (३ ऑक्टोबर) आर्यनला अटक करण्यात आले आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर शनिवारी (२ ऑक्टोबर) एका क्रूझ शिपमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकजण सहभागी होते. अशातच येथे रात्री पोलिसांची धाड पडली. पोलिसांना तेथे काही अं’मली पदार्थ सापडले. या सर्वांमध्ये शाहरुख खानच्या मुलाला देखील ताब्यात घेतले. त्याच्यासोबत आणखी आठ जणांना देखील अटक करण्यात आली आहे. तसेच आर्यनचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी

-आर्यनचे वकील मानेशिंदेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आर्यनला ‘ग्लॅमरचा तडका’ लावण्यासाठी…

-अभिनेते अनुपम खेर यांनी हिंदू धर्माबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘हिंदू असणे हे जीवन…’

हे देखील वाचा