Saturday, July 6, 2024

ऋता आणि अजिंक्यचा रेड कार्पेटवरील डान्स व्हिडिओ व्हायरल; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड!’

काही दिवसातच झी मराठीवर ‘झी मराठी पुरस्कार सोहळा’ टेलिकास्ट होणार आहे. या शोचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे रेड कार्पेटवरून अनेक कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. दररोज आपल्या भेटीला येणारे कलाकार रोजपेक्षा काहीतरी वेगळ्या पोशाखात दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांना बघताना देखील खूप आनंद होत आहे. अशातच आपल्या सगळ्यांची लाडकी दिपू (ऋता दुर्गुळे) आणि इंद्रा (अजिंक्य राऊत) यांचा एक सुंदर रोमँटिक व्हिडिओ समोर आला आहे.

ऋताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऋताने लाल रंगाचा सुंदर ड्रेस घातला आहे, तर अजिंक्य राऊत याने काळ्या रंगाचा सूट घातला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघांनी ‘इश्क वाला लव्ह’ या गाण्यावर रोमँटिक डान्स केला आहे. खास करून ऋताचा लूक सगळ्यांना खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तिचा हा लूक पाहून सगळेजण झी मराठी पुरस्कार सोहळा बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत. (Hruta durgule and Ajinkya raut’s dance video viral on social media)

ऋता आणि अजिंक्य यांच्या झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेची कहाणी काही वेगळी आणि प्रेममय असल्याने प्रेक्षकांना मालिका चांगलीच आवडली आहे. तसेच ऋता आणि अजिंक्यची केमिस्ट्री देखील सगळ्यांना खूप आवडत आहे. तसेच मालिकेचे शीर्षकगीत देखील मोठ्या संख्येने पसंत केले जात आहे.

ऋता ही टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. याआधी तिने ‘दुर्गा’ आणि ‘फुलपाखरू’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेतील तिचे वैदेही नावाचे पात्र खूप गाजले होते. यासोबतच तिने ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकात काम केले आहे. तसेच ती ‘स्ट्रॉबेरी शेक’ या शॉर्ट फिल्ममध्येही झळकली आहे. आता ती लवकरच ‘टाईमपास ३’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अशक्य सुंदर’, अमृता खानविलकरचा फोटो पाहून चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-‘कुछ कुछ होता है अभ्या…’, म्हणत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाने मजेशीर फोटो केले शेअर

-‘तू तुझा प्रोग्राम सुरू कर, मीच बॉस म्हणून’, वीकेंडला मांजरेकरांकडून मीरा अन् गायत्रीची खरडपट्टी

हे देखील वाचा