मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक सुंदर अभिनेत्री आहेत, पण यातील एका अभिनेत्रीने मात्र समस्त तरुण वर्गाला भुरळ घातली आहे. ती अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे. झी युवा या वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ या मालिकेतून ती नावारूपाला आली. या मालिकेतील तिच्या ‘वैदेही’ या पात्राने तिला भरभरून ओळख दिली. मालिकेतील तिचे पात्र, वेशभूषा, शीर्षक गीत एवढंच काय तर मालिकेतील वैदेही आणि मानसची प्रेमकहाणी सगळ्यांना खूप भावली होती. या मालिकेत ऋतासोबत यशोमन आपटे हा मुख्य भूमिकेत होता. ही मालिका बंद होऊन आता बराच काळ लोटला आले, तरीही ऋताची लोकप्रियता कमी झाली नाही. अशातच काही दिवसांपूर्वी तिच्या समस्त चाहत्या वर्गासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे ऋता लवकरच पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर आगमन करणार आहे.
ऋता झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचे प्रोमो मागील अनेक दिवसांपासून टेलिव्हिजनवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच मालिकेचे शीर्षक गीत देखील समोर आले आहे. प्रेक्षकांना हे शीर्षक गीत आणि डान्स स्टेप्स देखील खूप आवडल्या आहेत. (Hruta durgule and ajinkya raut’s video viral on social media)
या मालिकेत ऋतासोबत अभिनेता अजिंक्य राऊत दिसणार आहे. प्रोमोमध्ये त्या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता मालिका बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. अशातच ऋता आणि अजिंक्यचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या दोघांचा ‘माझ्या दिलाचो पावशेर किलोचो’ या गाण्यावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
त्यांचा हा व्हिडिओ झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यांचा हा क्यूट व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तसेच सगळेजण ही मालिका बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत, हे देखील कमेंटमध्ये सांगत आहेत. ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७: ३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सैराट’ फेम आर्चीच्या लूकमध्ये आलाय कमालीचा बदल; चाहत्यांकडून थेट श्रीदेवींशी केली जातेय तुलना
-‘गुलाबाची कळी’ तेजस्विनी पंडितचा सुंदर लूक पाहून कलाकारांसोबत चाहतेही झाले ‘शायर’, म्हणतायत…