Sunday, February 23, 2025
Home मराठी ठरलं तर! ‘या’ दिवशी सगळ्यांचं लाडकं ‘फुलपाखरू’ अडकणार लग्नबंधनात, ऋता दुर्गुळेच्या लग्नाची तारीख जाहीर

ठरलं तर! ‘या’ दिवशी सगळ्यांचं लाडकं ‘फुलपाखरू’ अडकणार लग्नबंधनात, ऋता दुर्गुळेच्या लग्नाची तारीख जाहीर

हिंदी सिनेसृष्टीत सध्या आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाचा बार उडाला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या लवस्टोरीचा लग्नाने गोड शेवट झाल्याने सगळीकडूनच त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूड पाठोपाठ आता मराठी चित्रपट लवकरच आणखी एक विवाह सोहळा पार पडणार आहे. हा विवाह सोहळा आहे. अभिनेत्री ऋता  दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रतिक शाहचा (Pratik Shah) . ऋता आणि प्रतिकचा साखरपुडा आधीच पार पडला असून त्यांच्या विवाहाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही लग्नाची उत्सुकता लागली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही मराठी मनोरंजन जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने तिने मराठी मालिका क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक दिवसांपासून ऋता आणि  प्रतिक शाहच्या प्रेमप्रकरणाची चर्चा रंगली होती. त्यांनीही या बातम्यांना दुजोरा देत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

त्यांनी डिसेंबर महिन्यात आपला साखरपुडाही उरकला होता. आता त्यांच्या लग्नाचीही तारीख समोर आली असून १७ मे रोजी दोघेही विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळाली आहे. या विवाह सोहळा मुंबईमध्ये पार पडणार आहे. दोघांनीही या बद्दलचा अधिकृत खुलासा केला नसला तरी त्यांनी त्याप्रमाणे त्यांच्या नियोजित मालिकांचे काम पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान अभिनेत्री ऋता दुर्गुळेने ‘दुर्वा’ मालिकेतून  छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले होते. तिच्या या पहिल्याच मालिकेने तिला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. मालिकेतील ऋताच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. सध्या ऋता ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत काम करताना दिसत आहे. तर पती प्रतीक शाह हा हिंदी मालिका क्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शख म्हणून प्रसिद्ध आहे. दोघांच्याही प्रेमप्रकरणाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्याचप्रमाणे विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे सुद्धा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत त्यामुळे मराठी मनोरंजन जगतातही लग्नाचा जोरदार धमाका पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा