Monday, October 13, 2025
Home मराठी ऋता दुर्गुळे ठरली मिलियनमध्ये फॅन क्लब असणारी पहिली मराठी अभिनेत्री, वाचा संपूर्ण माहिती

ऋता दुर्गुळे ठरली मिलियनमध्ये फॅन क्लब असणारी पहिली मराठी अभिनेत्री, वाचा संपूर्ण माहिती

झी युवा या वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ या मालिकेला आख्ख्या महाराष्ट्राने अगदी डोक्यावर घेतले होते. या मालिकेने विशेषतः तरुण वर्गाला भुरळ घातली होती. यासोबत या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिला देखील खूप लोकप्रियता मिळाली. तिचे निखळ सौंदर्य, गोड हसू यासोबत गालावर पडणारी छोटीशी खळी यावर अवघा तरुणवर्ग भुलला होता. तसेच मालिकेत वैदेही आणि मानसीची जोडी आणि त्यांची प्रेम कहाणी देखील चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेनंतर तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. ऋता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ऋतासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

ऋताचे इंस्टाग्रामवर २.४ मिलियन फॉलोवर्स पूर्ण झाले आहेत. एवढा मोठा फॅनक्लब असणारी ऋता ही मराठीतील पहिलीच अभिनेत्री आहे. ऋताची ओळख महाराष्ट्रची क्रश अशी आहे. अनेकांना ती खूप आवडते. सोशल मीडियावर तिच्या नावाचे अनेक फॅन पेज देखील सुरू केले आहेत. त्यामुळे तिच्या लोकप्रियतेत चांगलीच भर पडली आहे. (Hruta durgule become first Marathi actress of big fan club)

ऋताने काही महिन्यांपूर्वी अभिनेता आणि निर्माता प्रतीक शाह सोबत साखरपुडा केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर ती रिलेशनमध्ये असल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेचच तिने साखरपुडा केला. तिच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

ऋता ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे लाखांमध्ये फॉलोवर्स आहेत. तिने या आधी ‘दुर्वा’ या मालिकेत काम केले आहे. ती सध्या झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेतील तिचे दिपू नावाचे पात्र देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.

दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा