महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे आगामी ‘अनन्या’ चित्रपटात दिसणार आहे. ऋता नेहमीच तिच्या कामामुळेच नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने १८ मे रोजी प्रतिक शाहबरोबर लग्नगाठ बांधली आहे. आता तिने प्रतिकबरोबरचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे.
तिने व्हिडिओला ‘माझ्या खास व्यक्तीबरोबर मी हे करत आहे. माझ्याबरोबर माझी आवडती व्यक्ती या प्रवासात असल्याचा आनंद आहे,’ असे कॅप्शन दिलेय. या व्हिडिओमध्ये ऋताचे प्रतिकबरोबरील लग्नातील तसेच अन्य रोमँटिक क्षण दिसून येत आहेत.
View this post on Instagram
चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रेम व्यक्त केलंय.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)