Thursday, March 5, 2026
Home मराठी ‘मन उडू उडू झालं’च्या शीर्षक गीतावर ऋता दुर्गुळेने केला भन्नाट डान्स, सोबतच चाहत्यांना दिले ‘हे’ खास चॅलेंज

‘मन उडू उडू झालं’च्या शीर्षक गीतावर ऋता दुर्गुळेने केला भन्नाट डान्स, सोबतच चाहत्यांना दिले ‘हे’ खास चॅलेंज

झी युवा या चॅनलवरील ‘फुलपाखरू’ या मालिकेला आख्ख्या महाराष्ट्राने अगदी डोक्यावर घेतले होते. या मालिकेने विशेषतः तरुण वर्गाला भुरळ घातली होती. यासोबत या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिला देखील खूप लोकप्रियता मिळाली. तिचे निखळ सौंदर्य, गोड हसू यासोबत गालावर पडणारी छोटीशी खळी यावर अवघा तरुणवर्ग भुलला होता. तसेच मालिकेत वैदेही आणि मानसीची जोडी आणि त्यांची प्रेम कहाणी देखील चांगलीच लोकप्रिय झाली होती. सर्वांची लाडकी अभिनेत्री आता सर्वांना भेटण्यासाठी पुन्हा एकदा येणार आहे. ऋता झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचे प्रोमो मागील अनेक दिवसांपासून टेलिव्हिजनवर आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रेक्षकांनी प्रोमोला चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. अशातच ऋताचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ऋताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऋता ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेच्या शीर्षक गीतावर काही डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. हा डान्स झाल्यावर ती शेवटी सांगते की, “या स्टेप्स तुम्ही करा. पोस्ट करून झी मराठीच्या पेजला टॅग करा. हे दिपूचं चॅलेंज आहे.” (Hruta durgule’s dance on man udu udu jhal tital song, video get viral)

ऋताचा‌ हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सगळेजण तिच्या या व्हिडिओचे कौतुक करत आहेत. ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत ऋतासोबत अभिनेता अजिंक्य राऊत हा मुख्य भूमिकेत आहे. अजिंक्यने देखील त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या गाण्याच्या डान्स स्टेप करताना ऋताचा आणि त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या मालिकेत ऋताच्या पात्राचे नाव दिपाली असे आहे. तर अजिंक्यच्या पात्राचे नाव इंद्रजित असे आहे.

ऋता आणि अजिंक्य यांची धमाल प्रेमकहाणी पाहण्यासाठी सगळे प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत. ही मालिका ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७: ३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’

-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’

-केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

हे देखील वाचा