Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

फोटोमधील मुलगा आहे संगीत क्षेत्रातील कोहिनूर हिरा, १५ ऑगस्टला देशभर गुंजतो त्याचाच आवाज

सध्या सिने जगतातील अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे फोटो आणि त्यामधला कलाकार ओळखण्याचे आव्हान त्यांच्या चाहत्यांना दिले जाते. कलाकारांचे हे क्यूट फोटो ओळखणे त्यांच्या चाहत्यांनाही ओळखणे कठीण होऊन जाते. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मुलगा कोण असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांनाही पडला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

सोशल मीडियावर नेहमीच विविध कलाकारांच्या बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमधील कलाकार कोण असावा हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. सध्या आईसोबत उभ्या असलेल्या एका मुलाचा ब्लॅक अँन्ड व्हाईट फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा साधासुधा नाही तर हिंदी सिने जगतातील लोकप्रिय गायक आहे.  त्याच्या आवाजाची जादू देश-विदेशात पसरली आहे. लोक फक्त त्यांचा एक आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असतात. देशभरात त्यांच्या अनेक मैफिली आहेत. त्यांचा एक आवाज ऐकण्यासाठी चाहते परदेशातही जात असतात. 15 ऑगस्ट जवळ आला असतानाच या खास कलाकाराचा आवाज प्रत्येकाच्या कानात घुमतो.

चित्रात दिसणारा हा लहान मुलगा दुसरा कोणी नसून सुप्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार ए आर रहमान (A.Rehman) आहे. एआर रहमानचा हा बालपणीचा फोटो आहे ज्यामध्ये तो त्याच्या आईसोबत पोज देताना दिसत आहे. एआर रहमानने अशी अनेक गाणी गायली आणि संगीतबद्ध केली आहेत जी जिभेवर आल्याशिवाय राहू शकत नाहीत. ‘मां तुझे सलाम’, ‘जय हो’, ‘चले चलो’, ‘भारत हमको जान से प्यारा है’, ‘रंग दे बसंती’, ‘कदम कदम’, ‘ये जो देश है मेरा’ अशी अनेक गाणी आहेत. जे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या विशेष प्रसंगी देशभर वाजत असतात.

पुरस्कारांबद्दल बोलायचे झाले तर एआर रहमानला अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. ए आर रहमान यांना पद्मभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार इत्यादींनी सन्मानित करण्यात आले आहे. एआर रहमानने केवळ हिंदीतच नाही तर तमिळ तेलगू भाषेतही लोकप्रिय गाणी गायली आणि संगीतबद्ध केली आहेत.

हेही वाचा-

इंदिरा गांधींनंतर आणखी एक राजकीय भूमिका साकारणार कंगना, मधुर भांडाकर करणार चित्रपटाचे दिग्दर्शनकरीनावरही भारी पडला ‘अनुपमा’चा एकच ठुमका, ‘बेबो’च्या गाण्यावर रुपालीने केला जबरदस्त डान्ससंस्कार हो दुसरं काय! आर माधवनने रजनीकांत यांचे पाय शिवत घेतला आशीर्वाद, सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद

हे देखील वाचा