Friday, July 5, 2024

वाढदिवसादिनी शिल्पा शेट्टीला ‘निकम्मा’ चित्रपटाच्या टीमकडून भन्नाट सरप्राईज, घरासमोरील धमाल पाहून थक्क झाली अभिनेत्री

बॉलिवूडची सुपर मॉम म्हणून शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिल्पा शेट्टी तिच्या अभिनया इतकीच फिटनेससाठीही सर्वत्र लोकप्रिय आहे. बुधवार ( ८ जून) शिल्पा तिचा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्ताने शिल्पावर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव होत असलेला पाहायला मिळत आहे. यामध्ये शिल्पाच्या घरासमोर निकम्मा चित्रपटाच्या टीमने दिलेल्या जबरदस्त सरप्राईजने शिल्पाला चांगलाच धक्का दिला आहे. 

अभिनेत्री शिल्पा शेट्टीही हिंदी चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ८०- ९० च्या दशकातील तिच्या चित्रपटांची आजही चर्चा होत असते. चित्रपटांइतकीच शिल्पा सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्रीला शुभेच्छा देण्यासाठी शिल्पाच्या घरासमोर तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत होती. याचवेळी सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये शिल्पाच्या आगामी निकम्मा चित्रपटाच्या टीमने चाहत्यांसोबत तुफान डान्स केल्याचे  पाहायला मिळत आहे. निकम्मा किया इस दिल को हे या चित्रपटातील गाणे सध्या सर्वत्रच जोरदार हिट होत असून यावरील चाहत्यांनी आणि चित्रपटाच्या टीमने केलेला तडफदार डान्सने शिल्पालाही थक्क केले आहे. चाहत्यांच्या आणि सहकलाकारांच्या या गोड सरप्राईजचा आनंद शिल्पा तिच्या घराच्या बाल्कनीत उभी राहून घेत असल्याचेही यावेळी पाहायला मिळत आहे. यावेळी शिल्पाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि हलका मेकअप केल्याचे पाहायला मिळत आहे. या लूकमध्ये शिल्पा खूपच मनमोहक वाटत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा