Tuesday, July 9, 2024

‘कुंडली भाग्य’ फेम श्रद्धा आर्या लवकरच अडकणार विवाहबंधनात, ‘या’ दिवशी नौदल अधिकाऱ्याशी थाटणार संसार

छोट्या पडद्यावर झळकणारी अभिनेत्री श्रद्धा आर्या हे एक प्रसिद्ध नाव आहे. ‘कुंडली भाग्य’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत डॉ. प्रीता करण लूथराची भूमिका साकारून श्रद्धा लोकप्रिय झाली आहे. या शोमुळे ती घराघरात पोहोचली आहे. श्रद्धाला अनेकवेळा ऑन-स्क्रीन वधूच्या भूमिकेत पाहिले गेले आहे. मात्र, आता श्रद्धा लग्नाच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे मनोरंजन विश्वात वर्षानुवर्षे काम करणारी श्रद्धा अरेंज मॅरेज करत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रद्धाचा जीवनसाथी भारतीय नौदल अधिकारी आहे. खरं तर, श्रद्धाने तिच्या शोमध्येही अरेंज मॅरेजचा मार्ग स्वीकारला होता आणि खऱ्या आयुष्यातही तोच निर्णय घेतला.

‘या’ दिवशी श्राद्ध आर्या घेणार सात फेरे
माध्यमांतील वृत्तांनुसार, दिल्लीत श्रद्धा आर्याच्या लग्नाची तयारी सुरू आहे आणि ती १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी लग्नगाठ बांधणार आहे. श्रद्धा ही त्या टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच चर्चेत येते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. परंतु ती तिचे वैयक्तिक आयुष्य मीडियाच्या बातम्यांपासून पूर्णपणे अलिप्त असते.

कोणासोबत करणार आहे लग्न?
श्रद्धाच्या जोडीदाराबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु वृत्तांनुसार, अभिनेत्रीचा होणारा पती अभिनय क्षेत्रातील नाही. श्रद्धाच्या जोडीदाराचे नाव राहुल असून, तो नौदल अधिकारी आहे. श्रद्धाचे नाव कोणत्याही अभिनेत्याशी जोडले गेले नसले, तरी राहुलच्या आधीही श्रद्धाचा साखरपुडा झाला होता, जो तुटला होता.

सन २०१५ मध्ये एनआरआयशी केला होता साखरपुडा
श्रद्धाने सन २०१५ मध्ये एनआरआय जयंतसोबत साखरपुडा केला होता, पण दोघांनी लग्न करण्यापूर्वीच त्यांचे नाते संपुष्टात आले. दोघांमधील सलोखा हेच त्यांचा साखरपुडा तुटण्याचे कारण सांगितले जात होते. यानंतर श्रद्धाने व्यवसायाने उद्योजक आणि वकील असलेल्या आलम सिंगला डेट केले. या दोघांचे नाते जगजाहीर होते.

आलमसोबत ‘नच बलिये’मध्ये घेतला होता भाग
श्रद्धा आणि आलमचे नाते तेव्हा समोर आले, जेव्हा दोघांनी ‘नच बलिये ९’ या डान्स रियॅलिटी शोमध्ये एकत्र भाग घेतला होता. जेव्हा दोघेही या डान्स शोचा भाग बनले, तेव्हा दोघेही त्यांच्या नात्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते. या दोघांची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. आलमने सर्वांसमोर श्रद्धाला प्रपोज केले होते. त्यांची लव्हस्टोरी खूप चांगली होती आणि लोकांना ती आवडलीही होती, पण ‘नच बलिये’च्या समाप्तीमुळे त्यांचे नातेही संपुष्टात आले.

‘या’ टीव्ही शोचाही झाली आहे भाग
श्रद्धा आर्या गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग असून, ती आजही टीव्हीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. एकता कपूरच्या ‘कुंडली भाग्य’ फेम श्रद्धा आर्याने ‘लक्ष्मी तेरे आंगन की’, ‘तुम्हारी पाखी’, ‘ड्रीम गर्ल’मध्ये काम केले आहे. याशिवाय श्रद्धाने अनेक भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधे श्याम’च्या दिग्दर्शकाविरोधात प्रभासच्या चाहत्याने लिहिली सुसाईड नोट, दिली मरण्याची धमकी

-द बिग पिक्चर शोच्या सेटवर लहान मुलांना पाठीवर बसून फिरवताना दिसला सलमान खान

-‘सिंहीण परत आलीये…’, सुष्मिता सेनच्या ‘या’ खतरनाक स्टाइलने उडणार होश

हे देखील वाचा