टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठ अनेकदा टीव्ही रियलिटी शो ‘बिग बॉस’ मध्ये सहभागी होणाऱ्या प्रसिद्ध सेलिब्रिटींचं वैयक्तिक आयुष्य माहिती असल्याचा दावा करते. आता तिने राहुल महाजनच्या छुप्या विवाहबद्दल मोठा खुलासा केला आहे. गहनाने दावा केला आहे की राहुलने तीन नव्हे तर चार वेळा लग्न केले आहे.
राहुल महाजन याची तीन नाही तर चार लग्नं?
राहुल महाजन याने तीन नव्हे तर चार वेळा लग्न केलं असल्याचा आरोप गहना वशिष्ठ हिने केला आहे. ती म्हणाली की, राहुलने मंदिरात मुंबईतील मॉडेल भाविशा देसाईशी छुप्या पद्धतीने लग्न केले. जी मूळची गोव्याची आहे. पण गेली १५-१८ वर्षे ती मुंबईत काम करते आहे. गहनाच्या दाव्यानुसार, राहुल महाजन याने लग्नाच्या काही महिन्यांनंतर तिला सोडलं आणि ते दोघेही आता कोणत्याही प्रकारे संपर्कात नाहीत.
‘बिग बॉस १४’ मध्ये चॅलेंजर म्हणून राहुलची एन्ट्री!
राहुलने रविवारी रात्रीचे आव्हान म्हणून ‘बिग बॉस १४’ मध्ये प्रवेश केला आहे. राहुलशिवाय बिग बॉसच्या मागील पर्वात धमाका केलेले स्पर्धक कश्मीरा शाह, राखी सावंत, विकास गुप्ता, मनु पंजाबी आणि अर्शी खान यांनीही शनिवार व रविवारच्या भागात प्रवेश केला. माध्यमांनुसार भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल याने २०१८ मध्ये कझाकीस्तानची २४ वर्षीय मॉडेल नताल्या इलिनाशी लग्न केले. राहुलसोबत लग्नानंतर नताल्या हिने हिंदू धर्म स्वीकारला आहे. श्वेता सिंग आणि डिंपी गांगुलीपासून घटस्फोटानंतर ४३ वर्षीय राहुलचं हे तिसरं लग्न आहे.
आधीचे दोन विवाह घरगुती कलहामुळे मोडले.
घरगुती हिंसाचाराच्या आरोपाने राहुल महाजनचे पूर्वीचे विवाह मोडले. त्याची पहिली पत्नी श्वेता ही त्याची बालपणीची मैत्रिण होती. हे दोघे १३ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. श्वेताने राहुलवर घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप केला. या दोघांनी २००८ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर, २०१० मध्ये राहुल महाजनने ‘राहुल दुल्हनिया ले जाएगा’ या रिऍलिटी शोची स्पर्धक डिंपी गांगुली हिच्याशी लग्न केले. दोघांच्या लग्नाला चार वर्ष होत नाहीत तर २०१४ मध्ये दोघांनीही घटस्फोट घेतला. डिंपी हिने देखील राहुलवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.