Saturday, June 29, 2024

चित्रपटसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध संगीतकार रामलक्ष्मण यांचे निधन, सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ चित्रपटाला दिले होते संगीत

बॉलिवूडमधून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रतिभावान संगीतकार रामलक्ष्मण (विजय पाटील) यांचे निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. शनिवारी (२२ मे) सकाळी नागपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी सुपरस्टार सलमान खानचा पहिला सुपरहिट ‘मैंने प्यार किया’ चित्रपटाला आपले संगीत दिले होते. याव्यतिरिक्त त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना आपले संगीत दिले होते. यामध्ये ‘मैंंने प्यार किया’व्यतिरिक्त ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ हैं’, ‘अनमोल’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दिग्गज मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राम लक्ष्मण यांचे खरे नाव विजय पाटील होते. त्यांनी आपला मित्र सुरेंद्र (राम)सोबत इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु सुरेंद्र यांचे निधन खूप आधी झाले होते. त्यामुळे ही जोडी फार काळ चालली नाही. या जोडीने एकूण एक किंवा दोनच चित्रपटांना संगीत दिले होते. सुरेंद्र यांच्या निधनानंतर विजय यांनी आपले काम पुढे सुरू ठेवले. यासोबतच त्यांनी आपले नाव बदलून रामलक्ष्मण असे ठेवले. त्यानंतर त्यांना इंडस्ट्रीत राम लक्ष्मण नावानेच ओळखू लागले. त्यांनी कधीच आपल्या मित्राचे नाव हटवले नाही.

https://twitter.com/rajbansal9/status/1395974197235515395

रामलक्ष्मण यांनी हिंदी चित्रपटांसोबतच मराठी आणि भोजपुरी चित्रपटांनाही आपले संगीत दिले होते. सन १९७७ साली आलेला ‘एजंट विनोद’ चित्रपटाला या जोडीनेच संगीत दिले होते. परंतु अचानक सुरेंद्र यांचे निधन झाले. त्यामुळे विजय यांनी आपले नाव रामलक्ष्मण असे ठेवले.

सूरज बडजात्या यांची रामलक्ष्मण यांना होती पहिली पसंती
खरं तर आपल्या चित्रपटात संगीतसाठी रामलक्ष्मण हे सूरज बडजात्या यांची पहिली पसंती होती. १९८९ मध्ये आलेल्या सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ चित्रपटातून त्यांना ब्रेक मिळाला होता. चित्रपट आणि चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली होती. त्यानंतर सूरज बडजात्या यांनी त्यांच्यासोबत सतत आपल्या अधिकतर चित्रपटांमध्ये काम केले. यात ‘हम आपके हैं कौन’ (१९९४) आणि ‘हम साथ साथ हैं’ (१९९९) या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक

-प्रसिद्ध गायिकेला करावा लागला होता लैंगिक शोषणाचा सामना, वयाच्या १९ व्या वर्षी होती गरोदर

-क्या बात है! मिथुन चक्रवर्ती यांचा ‘डिस्को डान्सर’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; दिवाळीच्या आसपास होणार रिलीझ

हे देखील वाचा