Wednesday, July 3, 2024

‘मी हा चित्रपट करून खूप मोठी चूक केली’, ‘शेरशाह’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याचे धक्कादायक वक्तव्य

सध्या सर्वत्र फक्त ‘शेरशाह’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर या चित्रपटामुळे निर्माता करण जोहर आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील चर्चेत आहेत. तसेच सिद्धार्थसोबत धर्मा प्रोडक्शनचा दुसरा आवडता अभिनेता म्हणजे साहिल वैद. ज्याने या चित्रपटात काम केले आहे. परंतु त्याला आता असे वाटत की, त्याने हा चित्रपट करून चूक केली आहे. या मागचे कारणही साहिलने सांगितले आहे. त्याला असे वाटते की, ‘शेरशाह’ चित्रपटाचे पूर्ण श्रेय फक्त सिद्धार्थलाच मिळत आहे. त्याच्यासारख्या उर्वरित कलाकारांनी, ज्यांनी हा चित्रपट पूर्णत्वाला नेण्यासाठी कष्ट घेतले आहेत, त्यांच्याबाबत चर्चा होत नसून फक्त सिद्धार्थचीच सर्वत्र चर्चा होत आहे.

साहिलने सांगितल्यानुसार, त्याला चित्रपटात फौजीची भूमिका करायची होती, पण चित्रपटाच्या दिग्दर्शकाने त्याला सनीची भूमिका दिली. त्याचबरोबर धर्मा प्रोडक्शन्सचे त्याच्यावर खूप उपकार असल्याने तो त्याला नकार देऊ शकला नाही. (“I have made a big mistake by making this film,” said Sahil Vaid)

फार कमी लोकांना माहीत आहे की, विद्युत जामवालचा चित्रपट ‘जंगली’ रिलीझ झाला होता. त्यानंतर टाइम्स नेटवर्कच्या फिल्म प्रोडक्शन कंपनीच्या प्रमुखांना जिवलग मित्र विद्युतला घेऊन कॅप्टन विक्रम बत्रा यांचा बायोपिक बनवायचा होता. चित्रपटाच्या दिग्दर्शकानेही चित्रपटाचे काम विद्युतसोबत सुरू करण्याची योजना आखली होती. पण पुढे जाण्याऐवजी, जेव्हा चित्रपट अडकलेला दिसला, तेव्हा त्यात सिद्धार्थ मल्होत्राची एन्ट्री झाली आणि सिद्धार्थ मल्होत्रासाठी हा चित्रपट नंतर करण जोहरने दत्तक घेतला होता.

चित्रपट निर्माता म्हणून करण जोहरच्या ‘शेरशाह’ चित्रपटाशी जोडल्यानंतर कियारा अडवाणी व्यतिरिक्त, धर्मा कॅम्पच्या इतर कलाकारांनीही चित्रपटात एन्ट्री केली. सिद्धार्थ आणि कियारा वगळता लोकांनी चित्रपटात साहिल वैद, निकितन धीर आणि शिव पंडित हे कलाकारही यामध्ये होत. परंतु चित्रपटाच्या मार्केटिंग टीमने या तिन्ही कलाकारांची फारशी चर्चा करण्यास परवानगी दिली नाही. चित्रपटाच्या पीआर टीमने या कलाकारांना ना कोठे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घेऊन गेले. या गोष्टीचा आता अभिनेता साहिल वैदला त्रास होत आहे. साहिलने यापूर्वी धर्मा प्रॉडक्शनच्या ‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटांमध्ये खूप प्रशंसा मिळवली आहे.

साहिलच्या मते, त्याने कृतज्ञतेपोटी ‘शेरशाह’ हा चित्रपट केला आहे. माध्यमांशी बोलताना त्याने सांगितले की, “मला कळले होते की ही एक अतिशय लहान प्रकारची भूमिका आहे आणि मला हे पात्र करायचे नव्हते. मी चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी देखील याबद्दल बोललो आणि सांगितले की, मला कोणतीही भूमिका द्या ज्यात मला वर्दी घालण्याची संधी मिळाली. मी सैनिक होण्यासाठी देखील उत्सुक होतो. कारण मला आजपर्यंत कोणीही अशा पात्रात पाहिले नाही, पण दिग्दर्शकाला वाटले की, मी सनीच्या भूमिकेसाठी फिट आहे. धर्मा प्रोडक्शन्सचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि एकप्रकारे मी त्यांना धन्यवाद देण्यासाठी हा चित्रपट केला.”

साहिल वैद मान्य करतो की, चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या भावना बदलल्या आहेत आणि त्याला वाटते की त्याने हा चित्रपट नव्हता करायला पाहिजे. कारण त्याच्या कामाकडे कोणी लक्ष दिले नाही. तो पुढे म्हणाला की, “‘शेरशाह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रिव्ह्यूज प्रकाशित केले जात आहेत. लोक चित्रपटाबद्दल बोलत आहेत. परंतु कोणीही त्या कलाकारांबद्दल बोलत नाहीत, जे या चित्रपटाचा आधार आहेत. हे असे लोक आहेत ज्यांनी ‘शेरशाह’ चित्रपटासाठी छोट्या छोट्या भूमिका करण्यासाठी आपला स्वाभिमान मागे ठेवला आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे की, या लोकांना देखील कॅप्टन विक्रम बत्रा यांना श्रद्धांजली वाहण्याची इच्छा होती, पण आता चित्रपट पाहून असे वाटते की, मी हा चित्रपट करून खूप मोठी चूक केली आहे.”

हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रकाशित झाला नाही, तर हा चित्रपट ओटीटीवर प्रकाशित करण्यात आला आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टचा वीकेंड साधून प्रकाशित करण्यात आला होता. त्याचबरोबर हा चित्रपट खूप गाजला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ फेम स्कारलेट जोहान्सनच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन; पतीने पोस्ट शेअर करत सांगितले नाव

-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका

-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ

हे देखील वाचा