हळूहळू बॉलिवूडमध्ये आगामी काळात अनेक स्टारकिड्स एन्ट्री करणार आहेत. या स्टार किड्समध्ये सुहाना खानपासून ते ख़ुशी कपूरपर्यंत अनेक किड्स इंडस्ट्रीमध्ये आगामी काळात पदार्पण करू शकतात. सर्वच किड्स अभिनयात येतील की, या क्षेत्रातील दुसऱ्या फिल्डमध्ये जाऊन करियर करतील हे येणार कालच सांगेल. मात्र आपण जर आजच्या पिढीकडे पाहिले तर हे स्टार किड्स अभिनयात येण्यापूर्वी चित्रपटांची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी अनेक स्टार किड्स अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम करतात, जेणेकरून त्यांना या कामातील बारीक सारीक सर्व बाबी समजतील.
सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करून मग बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा हा नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. आतापर्यंत अनेक स्टार्स किड्सने आधी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले, त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, किंवा करणार आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या स्टार्स किड्सच्या यादीत आता अजून एका किडच्या नावाची भर पडणार आहे. आणि ते नाव म्हणजे इब्राहिम अली खान. नवाब सैफ अली खानचा मुलगा असणारा इब्राहिम करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शन करणार आहे.
इब्राहिम चित्रपटांमध्ये अभिनय करणार असे सर्वांना वाटत असतांना इब्राहिम सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून दिसणार हे समजल्यावर त्याच्या चाहत्यांना नक्कीच आश्चर्य वाटत आहे. करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात रणवीर सिंग, आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असून त्यांच्यासोबत धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी हे महत्वाच्या भूमिकेत दिसतील.
इब्राहिम हा सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा असून, या दोघांचा आता घटस्फोट झाला आहे. मात्र तरीही इब्राहिम आणि सारा अली खान यांचे सैफ अली खानसोबत बॉण्डिंग खूप चांगले आहे. काही वर्षांपूर्वीच साराने अभिनयात पदार्पण केले, त्यानंतर इब्राहिम अभिनयात कधी दिसणार याकडे त्याच्या फॅन्सचे लक्ष लागले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका
-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ