Monday, July 1, 2024

काय होतोय सैफ चा मुलगा इब्राहिम अली खानचा हा फोटो व्हायरल?

पटौदी कुटुंब हे आपल्या सौंदर्य आणि हुशारी साठी प्रसिद्ध आहे. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान सोशल मीडियावर आपल्या दिवाळीच्या फोटोजद्वारे त्याची प्रचिती देताना दिसतो आहे! दिवाळीनिमित्त त्यानी भारतीय पोशाखातील काही छायाचित्रे पोस्ट केली आणि त्याच्या कॉमेंट्स मध्ये असंख्य मुलींच्या कॉमेंट्सचा पाऊस पडला. अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या मर्द कलेक्शनच्या रेशम कुर्ता पायजामा मध्ये इब्राहिम अली खान अगदी राजबिंडा दिसत होता. “दिवाळी तो खतम हो गई, अब कैप्शन नहीं मिल रहा है” या कॅप्शनसह त्याने दोन छायाचित्रे पोस्ट केली. डिझायनर म्हणाले की तो राजकुमार दिसत आहे. त्याच्या या फोटोजवरील मुलींच्या कॉमेंट्स आपल्याला याची जाणीव करून देतात की त्याला किती मागणी आहे.

https://www.instagram.com/p/CHp68bNh8fT/

 

एका मुलीने “माझ्याशी लग्न कर” असे लिहिले होते, तर दुसऱ्या मुलीने “चल याला होळी बनवूया. मुझे तेरे रंग में रंगना है.” अशी कॉमेंट लिहिली. एका चाहत्याने असे म्हटले आहे की त्याला कोणत्याही कॅप्शनची आवश्यकता नाही, तो म्हणला “तुझा चेहरा मॅक डोनाल्डचा आहे का कारण की मी त्यावर प्रेम करतो?”
इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलेला इब्राहिम अली खान आता मुंबईत आहे. दिवाळीच्या निमित्ताने सारा अली खान, अमृता सिंग आणि अबू जानी आणि संदीप खोसला क्रिएशनमध्ये पोझ देताना ते सगळेच फार सुंदर दिसत होते.

 

 

इब्राहिम बॉलिवूडमध्ये करिअर करण्याच्या बाबतीत तो काय विचार करतोय याबद्दल सैफ अली खान अलीकडेच बोलला. त्याने स्पॉटबॉयईला सांगितले की, “इब्राहिम अभिनयाच्या करिअरसाठी तयार दिसत आहे. आणि का नाही? मला इच्छा आहे की माझी सर्व मुले या व्यवसायात असावीत. ही काम करण्यासाठी सर्वात चांगली जागा आहे. मला आठवते की १७-१८ व्या वर्षांमध्ये संपूर्ण गोंधळून गेलो होतो.”अभिनयाने मला वाचवलं. नोकरी मिळाल्यामुळे, अभिनयामुळे मिळालेली ओळख आणि नोकरीचे समाधान आणि आनंद मी विचार केला होता त्या पलीकडचा आहे.”

हे देखील वाचा