Wednesday, June 26, 2024

‘मुकेश अंबानी जर ॲक्टर असते तर कधीच बीझनेसमनचा रोल मिळाला नसता’

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांनी अनेक सेक्टरमध्ये मोठ-मोठ्या कंपन्या उभ्या केल्या आहेत. परंतू हेच मुकेश अंबानी जर अभिनय क्षेत्रात असते तर त्यांना कधीही बीझनेसमनचा रोल करण्याची संधी मिळाली नसती, असे भाष्य हिंदी सिनेमासृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्याने केले आहे.

अंबानी अभिनेते असते तर रोल मिळाला नसता

पंकज त्रिपाठी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हे भाष्य केले आहे. बॉलीवूडचे सिनेमे प्रचंड स्टेरिओटाईप असल्याचे त्यांनी या वेळी भाष्य केले. त्रिपाठी यावेळी म्हणाले, ‘मुकेश अंबानी जर बिझनेसमन नसते (If Mukesh Ambani was not a businessman) आणि ते ऑडीशनला गेले असते तर त्यांना कधीही श्रीमंत व्यक्तीचं पात्र मिळालं नसतं. कारण ते तसे दिसत नाहीत. शेवटी ते असंही म्हणाले , आता स्थिती बदलत आहे, परंतू जुने चित्रपट खुप रुढीवादी होते. कारण हिंदी सिनेमात बीझनेसमनसाठी जसे चेहरे असतात, तसा त्यांचा चेहरा नाही. हिंदी सिनेमे एक स्टेरीओटाइप (stereotype) बनले आहेत, डाॅक्टर असा दिसायला हवा किंवा इंजिनिअर असा दिसायला हवा. चित्रपटांमध्ये कॅटरीनासारखे डाॅक्टर दाखवले जातात, परंतू प्रत्यक्षात AIIMS मध्ये असे किती डाॅक्टर दिसतात?’

हिंदी सिनेमातील रुढीवादी विचारांवर परखड भाष्य करताना ते म्हणाले, ‘ऑडिशन दरम्यान एखाद्या जुनियर कलाकाराची जरी गरज असली तरी आधी हे स्पष्ट केले जाते की तुमचा लुक रीच असायला हवा.’

पंकज त्रिपाठी लवकरच दिसणार अटलजींच्या भूमिकेत

पंकज त्रिपाठींनी(Actor Pankaj Tripathi) गॅंग्स ऑफ वासेपूरपासून मीमीपर्यंत अनेक चित्रपटांत त्यांच्या अप्रतिम अभिनयाने स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यांच्या अभिनयातून ते कित्तेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या या भाष्याला (Pankaj Tripathi’s comment on mukesh Ambani) महत्त्व आले आहे.

त्यांच्या फुकरे, मसान, मीमी, फुकरे रीटर्न्स, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमातील भूमिका विशेष गाजल्या आहेत. लवकरच ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारलेल्या “मै अटल हुॅं” (Main Atal Hoon) या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. रवी जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

हे देखील वाचा