टॉलिवूड आणि बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री इलियाना डिक्रुझ सध्या तिची प्रेग्नन्सी एन्जॉय करत आहे. इलियानाने काही महिन्यांपूर्वी ती प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले. लग्नाआधीच इलियाना प्रेग्नेंट असल्यामुळे तिच्या प्रेग्नन्सीची माध्यमांमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये तुफान चर्चा झाली. मात्र तिने याकडे सपशेल दुर्लक्ष केले. इलियाना सतत तिच्या प्रेग्नन्सीबद्दल विविध पोस्ट शेअर करत फॅन्सला अपडेट देत असते. मात्र इलियानाने जशी तिच्या प्रेग्नन्सीची न्यूज सर्वांना दिली तसा सर्वांना एकच प्रश्न पडला होता आणि तो म्हणजे तिच्या बाळाचे वडील कोण आहेत? मात्र याबाबत तिने पूर्णपणे मौन बाळगले होते. पण आता तिने तिच्या आयुष्यातील त्या खास ‘मिस्ट्री मॅन’ला जगासमोर आणले आहे. तिने नुकताच त्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
इलियानाने तिच्या बॉयफ्रेंडसोबत खास रोमँटिक ‘डेट नाइट’ एन्जॉय केली. याचे काही फोटो तिने शेअर केले आहे. इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर हार्ट ईमोजीसोबत तिने तिच्या बॉयफ्रेंडचे फोटो शेअर केली आहेत. यामध्ये ती अतिशय रोमॅंटिक आणि कोझी मूडमध्ये आहे. इलियानाने यात स्ट्रेपी रेड ड्रेस घातला असून त्यात ती कमालीची सुंदर दिसत असून, यात तिचे बेबी बंप देखील दिसत आहे.
View this post on Instagram
तत्पूर्वी इलियानाने याआधी तिच्या बॉयफ्रेंडचा एक अंधुक फोटो मागच्या महिन्यात शेअर केला होता. तो फोटो आणि आता शेअर केलेले फोटो तिच्या फॅन्सने लगेच मॅच करून पाहिले. मात्र तसे पाहिले तर अजूनही तिने अधिकृतरीत्या आणि स्पष्टपणे हाच व्यक्ती तिच्या बाळाचा बाबा असल्याचे जाहीर केलेले नाही. त्यामुळे अजूनही कुठेतरी त्याबद्दल फॅन्स आणि लोकांमध्ये साशंकता आहे. याआधी इलियाना कॅटरिना कैफचा भाऊ असलेल्या सेबेस्टियन लॉरेंटला डेट करत असल्याच्या बातम्या खूपच गाजल्या होत्या. मात्र त्या सर्व अफवा होत्या.
सध्या इलियाना तिची प्रेग्नन्सी एन्जॉय करत असून, तिने काही दिवसांपूर्वीच तिच्या बेबी मुनचे काही फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. इलियानाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती रणदीप हुडासोबत ‘अनफेयर एंड लवली’मध्ये दिसणार आहे. शिवाय ती विद्या बालन, प्रतीक गांधी, सेंथिल राममूर्ति यांच्यासोबत एका प्रोजेक्टचा देखील भाग असणार आहे.