Monday, July 1, 2024

धक्कादायक! मनोरंजनविश्वातील ‘या’ आघाडीच्या अभिनेत्रीला साऊथ इंडस्ट्रीमध्ये केले बॅन?

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकणारी अभिनेत्री म्हणून इलियाना डिक्रूजला ओळखले जाते. इलियाना सतत तिच्या बोल्ड फोटोंमुळे अथवा तिच्या तब्येतीमुळे चर्चांमध्ये येत असते. तिची तब्येत थोडी खराब असल्याचे तिने सोशल मीडिया अकाऊंटवरून सांगितले होते. तसे पाहिले तर इलियानाला मोठी फॅन फॉलोविंग आहे. मात्र आता तिच्याबाबतीत एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत असून, तिला साऊथमध्ये बॅन केल्याचे सांगितले जात आहे.

प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार एका तामिळ निर्मात्याने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली की पैसे देऊनही इलियाना शूटिंगला आली नाही. यामुळे निर्मात्यांना मोठे नुकसान झाले आहे. यानंतर आता तामिळ प्रोड्युसर तिला चित्रपटात घ्यायला काचकूच करत आहे. मात्र याबाबत अजून कोणतेही अधिकृत माहिती समोर आली नसून, ना ही इलियानाकडून बाबत कोणती माहिती समोर आली आहे. मात्र जर ही बातमी खरी असली तर तिच्यासाठी आणि तिच्या करियरसाठी ते नक्कीच मोठे नुकसान समजले जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

दरम्यान इलियाना डिक्रूझने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही हॉस्पिटलमधले फोटो शेअर केले होरे. यासोबत तिने लिहिले होते की, “एक दिवस किती काही बदलू शकतो. काही चांगले डॉक्टर आणि IV फ्लूइड्सच्या तीन बॅग” तिची तब्येत आणि पोस्ट पाहून तिचे फॅन्स तिच्यासाठी प्रार्थना करत होते. मात्र तिने हे नाही सांगितले की, ती कोणत्या कारणासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. पुढे तिने ती घरी आल्यानंतर सर्वाना धन्यवाद म्हणत एक पोस्ट शेअर केली होती.

तत्पूर्वी इलियानाचा ‘अनफेयर एंड लवली’ हा सिनेमा मागील बऱ्याच काळापासून अडकला आहे. यात ती रणदीप हुडासोबत दिसणार आहे. २०२० मध्ये या सिनेमाची घोषणा झाली होती, मात्र नंतर काहीच माहिती नाही. रंगभेदावर तयार होणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन बलविंदर सिंग जंजुआ करणार होते. हा एक कॉमेडी सिनेमा होता.

 

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सतीश कौशिक यांच्यावर संपूर्ण सीने इन्डस्ट्रीजचे कलाकार करायचे प्रेम, सोशलवर आलाय श्रद्धांजलीचा पूर्, अनेकांना अश्रू अनावर
‘विवाह’ फेम पूनम म्हणजेच अभिनेत्री अमृता राव एका जाहिरातीसाठी घेते एवढे पैसे; करोडो संपत्तीची आहे मालकीण 

हे देखील वाचा