Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘वयाच्या 12 व्या वर्षापासून करतेय बॉडी शेमिंगचा सामना’, अभिनेत्री केला मोठा खुलासा

बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये इलियाना डिक्रूजच्या नावाचा समावेश होतो. इलियाना ही तिच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिला सोशल मीडियावर अनेक युजर्सकडून बॉडी शेमिंगबद्दल अनेक कमेंट येत असतात. नुकतेच एका मुलाखतीत इलियानाने बॉडी शेमिंग आणि माणसांची मानसिकता यावर भाष्य केले आहे. तिने आधी पासूनच या गोष्टींकडे कानाडोळा केला आहे. पण तिला आता असे वाटते की, आपण या विषयावर बोलले पाहिजे.

इलियानाने सांगितले की, “मला अजूनही ते दिवस आठवतात, आणि सगळ्या गोष्टी आठवल्यावर मला असे वाटते हे सगळं माझ्यासोबत काल परवाच घडलं आहे. कारण तो मला माझ्या आयुष्यातील एक काळा डाग वाटतो. मी वयाच्या 12 व्या वर्षापासूनच या बॉडी शेमिंगचा सामना करत आहे. मी युवा होत होते. त्यावेळी माझ्यावर अशा कमेंट्स केल्या जात होत्या. लोक तुमच्या बॉडीवर कमेंट्स करत म्हणतात ‘अरे देवा, तुझे बट इतके मोठे का आहे?’ आणि मी विचार करायचे की याचा अर्थ काय आहे? तुम्हाला वाटतं की, तुम्ही योग्य आहात आणि अचानक लोक तुम्हाला तसेच म्हणू लागतात, त्यामुळे तुमचाही त्यावर विश्वास बसू लागतो.

पुढे तिने सांगितले की, “या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करणे आणि स्वतःला समजावणे वाटते तितके सोपे नाहीये. आजही मला इंस्टाग्रामवर माझ्या बॉडीवरून कमेंट येतात. मी माझ्या फोटोमधील किमान 10 तरी अशा कमेंट दाखवू शकते, ज्या माझ्या बॉडीवर केलेल्या असतात. पण मी आता या गोष्टींना दुर्लक्षित करायला शिकले आहे. कारण माझ्या मनाला आणि शांत ठेवणे मला जास्त महत्त्वाचे वाटते.”

अशाप्रकारे इलियानाने युजर्सवर चांगला निशाणा साधला आहे. तिला या सगळ्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही, असे देखील सांगितले आहे.

इलियानाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अभिषेक बच्चन सोबत ‘द बिग बुल’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच अनिस बज्मी यांच्या ‘पागलपंती’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनिल कपूर, जॉन अब्राहम, अर्शद वारसी, पुलकित सम्राट, उर्वशी रौटेला आणि सौरभ शुक्ला यांनी काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुम्ही भारताला कोरोना लसीचा पुरवठा करू शकता का?’ भारताची वाईट परिस्थिती पाहून प्रियांका चोप्राचे अमेरिकेच्या राष्ट्रपतींना ट्वीट

-आनंदाची बातमी! कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले अडकले लग्नबंधनात, साध्या पद्धतीने पार पडला लग्नसोहळा

-महिलेकडे स्तनपान करतानाचा व्हिडिओ मागणाऱ्या व्यक्तीला अभिनेत्री नेहा धुपियाची चपराक; फोटो शेअर करत दिले सडेतोड प्रत्युत्तर

हे देखील वाचा