Friday, July 5, 2024

‘हा’ आहे २०२२चा सगळ्यात ‘लोकप्रिय’ चित्रपट, पहा प्रेक्षकांची पसंती नेमकी कोणाला?

‘आय.एम.डी.बी.’ने (IMDb) नुकतीच या वर्षातील सगळ्यात लोकप्रिय चित्रपटांची यादी जहीर केली आहे. या यादीत १ जानेवारी २०२२ ते ५ जुलै २०२२ दरम्यान प्रदर्शित झालेल्या सिनेमांचा समावेश आहे. ज्या सिनेमांना आय.एम.डी.बी (IMDb) वर ७ पेक्षा अधिक रेटींग आहे, फक्त अशाच सिनेमांचा समावेश या यादीत केलेला आहे. या सिनेमांने आय.एम.डी.बी प्रो (IMDbPro) डेटाच्या आधारावर, फोर वीक पोस्ट रिलीज़ विंडोच्या आत, भारतात सगळ्यात जास्त पेज व्हयू जनरेट केला आहे. या यादीत दाक्षिनात्य सिनेसृष्टीतील सिनेमांनी, पहिल्या आणि दुसर्या क्रमांकाची बाजी मारली आहे. ८.६ रेटींगसह पहिल्या क्रमांकावर कमल हासन आणि विजय सेतुपतीचा ‘विक्रम’ आहे तर, दुसऱ्या क्रमांकावर यश आणि संजय दत्तचा, ‘के.जी.एफ चॅप्टर २’ आहे.

साल १९९०च्या कश्मीर बंडखोरीवर आधारीत असलेला, विवेक अग्निहोत्रीचा, ‘द कश्मीर फाइल्स’ ओटीटी प्लॅटफोर्म झी.५ वर प्रदर्शित करण्यात आला होता. हा सिनेमा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. याला ८.३ इतकी रेटींग आहे. (imdb top 10 films of 2022 list released see here)

एस.एस.राजामौलीचा ‘आर.आर.आर’ याला समीक्षक आणि प्रशंसकांच समान प्रेम मिळालं. या सिनेमाची कथा काल्पनिक असून, स्वतंत्रता सैनिक अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्यापासुन प्रेरित आहे. यामध्ये ‘राम चरण’ आणि ‘जूनियर एन.टी.आर’ यांनी प्रमुख भूमिका निभावली होती. या सिनेमाला ८.० इतकी रेटींग आहे.

यादीत पुढचं नाव आहे, नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला आणि अमिताभ बच्चन यांचा अभिनय लाभलेला, झुंड. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असून, याला ७.४ इतकी रेटींग आहे.

२०२२चे टॉप १० भारतीय सिनेमे रेटींगसह:
१. विक्रम (८.६)
२. के.जी.एफ चॅप्टर २ (८.५)
३. द कश्मीर फ़ाइल्स (८.३)
४. हृदयम (८.१)
५. आर.आर.आर (८.०)
६. अ थर्सडे (७.८)
७. झुंड(७.४)
८. रनवे ३४ (७.२)
९. गंगूबाई काठियावाड़ी (७.०)
१०. सम्राट पृथ्वीराज (७.०)

हे देखील वाचा