मागच्या वर्षांपासून कोरोनामुळे जरी सण व्यवस्थित साजरे होत नसले, तरी इतर वर्षी मोठ्या उत्साहात हे सण साजरे केले जातात. दीर्घकाळ चालणारा नवरात्रीचा सण हा सर्वांचा आवडता सण आहे. नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर करण्याचा सण! हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. सर्वचजण हा सण अगदी जल्लोषात साजरा करतात.

नवरात्रीमध्ये नऊ दिवस पूर्ण मनोभावाने आणि श्रद्धेने देवीची आराधना केली जाते. या नऊ दिवसांत देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांचे दर्शन आपल्याला घडते.

हे दर्शन आपल्याला देवीच्या अंगावरील साडीतून घडते, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आज शुक्रवार, (८ ऑक्टोबर) नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीला हिरव्या रंगाची साडी नेसवली जाते.

मात्र दुसऱ्या दिवशी हिरवा रंगच का? यामागचे कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊया नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगाचं महत्व…

दुसरा दिवस दुर्गा देवीचे दुसरे रूप ब्रम्हचारणीचा होय. ब्रहचारणी या रूपात ती अध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात असलेली स्त्री आहे. या देवीला हिरवा रंग प्रिय आहे.

या रूपात दुर्गा किंवा पार्वती देवी तपस्या करण्यासाठी हिरव्याकंच पर्वतावर जाते. याठिकाणीच तिचा भावी पती भगवान शिव आहे. इथे ती भगवान शिव यांच्याबरोबर सर्वसंगत्याग करते. म्हणून इथे हिरवा रंग हा विकास, निसर्ग आणि उर्जा यांचे द्योतक आहे. शिवाय हिरवा रंग आजार दूर करतो, असेही म्हटले जाते.

ब्रम्हचारणीचा अर्थ होतो तपाचे आचरण करणारी. आई ब्रम्हचारणीच्या पूजेसाठी नारंगी आणि हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. या दिवशी आईला हिरव्या रंगाची पानं आणि हिरव्या रंगाचे हार अर्पण करावे. तसंच आईला साखरेचा नैवेद्य ठेवावा. त्यामुळे ती लवकर प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात
-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर
-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी