Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

यहुदी संस्कृतीची माहिती देणारा, भयपटांच्या अजून एक पाऊल पुढे जाणारा ‘डिबुक’ लवकरच होणार प्रदर्शित

इम्रान हाश्मी हिंदी चित्रपट क्षेत्रातील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. अनेक सुपरहिट चित्रपटात त्याने काम केले आहे. आता लवकरच तो OTT प्लॅटफॉर्मवर आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खुद्द इम्रान हाश्मीने या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, इम्रान हाश्मी लवकरच ‘डिबूक’ नावाच्या भयपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा इम्रानचा OTT प्लॅटफॉर्मवर पहिलाच चित्रपट असेल. याआधी इम्रानचा ‘चेहरे’ चित्रपट पहिल्यांदा चित्रपटगृहात आणि नंतर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या आगामी चित्रपटात इम्रान हाश्मी सोबत अमिताभ बच्चनसुद्धा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. ‘डिबूक’ चित्रपट ‘यहुदी’ संस्कृतीवर आधारित आहे. ज्यामध्ये एक रहस्यमय पुस्तक उघडताच अनेक भयावह घटना घडायला सुरुवात होते अशी कथा दाखवली आहे. माध्यमाशी बोलताना इम्रान हाश्मीने या चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती दिली.

या चित्रपटाबद्दल बोलताना इम्रान हाश्मीने सांगितले की, मी याआधी सुद्धा हॉरर चित्रपटात काम केले आहे परंतु या चित्रपटातील दृष्य नवीन रुपात दाखवली आहेत. अशी दृश्य तुम्ही याआधी पाहिली नसतील त्यामुळे हा माझा सगळ्यात जास्त हॉरर चित्रपट असेल. हा चित्रपट ‘एजरा’ या तामीळ चित्रपटाचा रिमेक आहे परंतु आम्ही त्यातली भयावहता वाढवली आहे.

या मुलाखतीत पुढे बोलताना इम्रान हाश्मी म्हणाला की ”माझे ‘किस ऑफ लाइफ’ आत्मचरित्र मागच्याच वर्षी प्रकाशित झाले आहे. यामध्ये मी माझ्या मुलाच्या कॅन्सर विरुद्धच्या लढ्याविषयी लिहले आहे. एका मोठ्या दाक्षिणात्य निर्देशकाला यावर आधारित चित्रपट बनवायचा होता. त्यांची इच्छा होती की मीच यामध्ये काम करावे, परंतु मला पुन्हा त्या कटू आठवणी आठवायच्या नाहीत. त्यामुळे कोणीतरी दुसर्‍याने त्यात काम करावे अशी माझी इच्छा होती. याचमुळे या पुस्तकावर आधारित चित्रपट होता होता राहिला.”

दरम्यान ‘डीबूक’ हा एक यहूदी शब्द आहे ज्याचा अर्थ ‘आत्मा’ असा होतो. या चित्रपटातून पहिल्यांदा प्रेक्षकांना यहूदी संस्कृती आणि परंपरेबद्दल जाणून घ्यायला मिळणार आहे. यहूदी संस्कृतीमध्ये सुद्धा डिबुकचा उल्लेख आढळून येतो. चित्रपट पाहताना प्रेक्षक सॅम आणि माहीच्या भूमिकेशी एकरूप होतील त्यासोबतच त्यांना या दोघांच्या प्रेमकथेतून एका नव्या संस्कृतीबद्दल ही जाणून घ्यायला मिळेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मीरा जग्गनाथच्या अश्रूंचा फुटला बांध, गायत्री दातारला मिठी मारत मन केले मोकळे

-अभिनय क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कलारंभ २’ या अनोख्या अभिनय प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा 

-सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक पद्धतीने जोडी अडकली लग्नबंधनात

हे देखील वाचा