Sunday, October 6, 2024
Home बॉलीवूड ‘जाने तू या…जाने ना’ फेम अभिनेत्याला आता ओळखणे देखील झाले कठीण

‘जाने तू या…जाने ना’ फेम अभिनेत्याला आता ओळखणे देखील झाले कठीण

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये धुमधडाक्यात पदार्पण करतात. त्यांना तुफान लोकप्रियता, प्रसिद्धी मिळते. मात्र मधेच काहीतरी असे घडते आणि ते कलाकार अचानक या ग्लॅमरच्या जगात हळूहळू मागे पडत जातात आणि काही काळाने इंडस्ट्रीमधून गायब होतात. असाच एक अभिनेता म्हणजे इम्रान खान. ‘जाने तू या जाने ना’ या सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणाऱ्या इम्रानने पहिल्याच सिनेमातून मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला आणि अचानक गायब झाला.

आता पुन्हा एकदा इम्रान खान चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे आमिर खानची मुलगी असलेल्या इरा खानने ईदच्या निमित्ताने शेअर केलेली पोस्ट. इराने ईदच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये इम्रान खान दिसला आणि नेटकऱ्यांना त्याला पाहून धक्काच बसला. चित्रपटांमध्ये अतिशय हँडसम दिसणारा इम्रान या फोटोंमध्ये ओळखला देखील जात नाही. सध्या त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांच्या भरपूर कमेंट्स येत आहेत.

इरा खानने ईदच्या निमित्ताने काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले. यात ती तिचा बॉयफ्रेंड असलेल्या नुपूर शिखरेसोबत दिसत असली तरी काही फोटो तिने कुटुंबासोबतचे देखील शेअर केले आहेत. त्यातल्याच एका फोटोमध्ये इम्रान खानचे दर्शन सर्वांना झाले. कुर्ता पायजमा, हलकी पांढरी दाढी, केस असलेल्या व्यक्तीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आणि तो इम्रान खान असल्याचे समजल्यावर तर अनेक चर्चाना उधाण आले.

चित्रपटांमध्ये आल्यानंतर चॉकलेट बॉय, निरागस हिरो म्हणून इम्रानने त्याची ओळख निर्माण केली. त्याच्या पहिल्या सिनेमानंतर अनेकांनी ‘लांबी रेस का घोडा’ म्हणत इम्रानबद्दल भविष्यवाणी केली होती. आय हेट लव स्टोरीज, दिल्ली बेली, मेरे ब्रदर की दुल्हर, आणि एक मैं और एक तू आदी अनेक चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका, मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या इम्रानच्या नशिबात मात्र काही औरच होते.

लहानपणापासूनच चित्रपटांची पार्श्वभूमी लाभलेल्या इम्रान खानने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो मुख्य भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आला. मात्र त्याची कारकीर्द अयशस्वी ठरली. इम्रान खानने त्याची मैत्रीण असलेल्या अवंतिका मालिकांसोबत २०११ ला लगीनगाठ बांधली आणि २०१४ साली त्यांनी त्यांच्या मुलीचे स्वागत केले. मात्र २०१९ पर्यंत त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि लग्नाच्या ८ वर्षांनी ते वेगळे झाले. बॉलिवूडपासून आणि सोशल मीडियापासून लांब असलेला इम्रान अचानक चर्चेत आल्यामुळे त्याच्या फॅन्सला आनंद झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा